• Download App
    Tej Pratap Yadav तेजप्रताप यादव यांची आणखी एक सोशल

    Tej Pratap Yadav : तेजप्रताप यादव यांची आणखी एक सोशल मीडिया पोस्ट आली चर्चेत!

    Tej Pratap Yadav

    राजद प्रमुख लालू आणि राबडीदेवी यांच्यानंतर आता तेजप्रताप यांनी कुणाला दिला संदेश आणि काय म्हटले?


    विशेष प्रतिनिधी – Tej Pratap Yadav राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) प्रमुख आणि माजी केंद्रीय मंत्री लालू प्रसाद यादव यांनी अलीकडेच त्यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव यांना पक्ष आणि कुटुंबातून बाहेर काढले आहे. यानंतर, तेजप्रताप यादव यांची पहिली प्रतिक्रिया रविवारी आली होती. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट केली होती. ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या आई राबडीदेवी आणि वडील लालू प्रसाद यादव यांचा उल्लेख केला होता.Tej Pratap Yadav

    त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या पालकांना त्यांचे जग म्हटले होते. यानंतर, तेजप्रताप यांनी आता आणखी एक सोशल मीडिया पोस्ट केली आहे. त्यांनी ही पोस्ट त्यांचा धाकटा भाऊ तेजस्वी यादव यांच्या नावाने केली आहे. ज्यामध्ये त्यांनी तेजस्वी यादव यांना आशीर्वाद देत, त्यांच्या माता-पित्यांची काळजी घेण्यास सांगितले आहे.



    तेजप्रताप यादव यांनी त्यांच्या दुसऱ्या सोशल मीडिया पोस्टमध्ये तेजस्वी यादव यांना उद्देशून लिहिले, “मला माझ्या अर्जुनपासून वेगळे करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांनो, तुम्ही तुमच्या कटात कधीही यशस्वी होणार नाहीत, तुम्ही कृष्णाची सेना घेऊ शकता पण स्वतः कृष्णाला नाही.”

    पुढे लिहिले आहे की, ‘मी लवकरच प्रत्येक कटाचा पर्दाफाश करेन. ‘फक्त विश्वास ठेव माझ्या भावा, मी प्रत्येक परिस्थितीत तुझ्यासोबत आहे, सध्या मी दूर आहे, पण माझे आशीर्वाद नेहमीच तुझ्यासोबत असतील. माझ्या भावा, आई-वडिलांची काळजी घे, जयचंद सर्वत्र आहे, आत आणि बाहेरही.’

    या पोस्टपूर्वी तेजप्रताप यादव यांनी रविवारी सकाळी एक भावनिक पोस्ट केली होती. त्यांनी लालू यादव आणि राबडी देवी यांच्यासाठी ही पोस्ट केली होती. ज्यामध्ये त्यांनी लिहिले होते, “माझे प्रिय मम्मी, पप्पा. माझे संपूर्ण जग तुमच्या दोघांमध्ये आहे. तुम्ही आणि तुम्ही दिलेला कोणताही आदेश देवापेक्षाही मोठा आहे. तुम्ही असाल तर माझ्याकडे सर्वस्व आहे. मला फक्त तुमचा विश्वास आणि प्रेम हवे आहे, दुसरे काहीही नाही. पप्पा, जर तुम्ही नसता तर ना हा पक्ष असता ना माझ्यासोबत राजकारण करणारे जयचंदसारखे काही लोभी लोक. फक्त मम्मी पप्पा, तुम्ही दोघेही नेहमी निरोगी आणि आनंदी राहा.”

    Another social media post by Tej Pratap Yadav has come under discussion

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    वंदे मातरम वरील चर्चेत नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात!!

    पाकिस्तानचे LoC वर 68 नवीन दहशतवादी लॉन्चपॅड; 120 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याची तयारी

    आता ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद स्मारक बनवण्याची घोषणा; तहरीक मुस्लिम शब्बनचे अध्यक्ष म्हणाले- बाबरच्या नावाने त्रासून जाऊ नये