विमानात ८० प्रवासी होते, ज्यात ७६ प्रवासी आणि ४ क्रू मेंबर्स यांचा समावेश आहे.
विशेष प्रतिनिधी
टोरंटो : Toronto airport डेल्टा एअरलाइन्सचे विमान क्रमांक ४८१९चा अपघात झाला आहे. हे विमान मिनियापोलिस-सेंट पॉल विमानतळावरून टोरंटो पिअर्सन आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जात होते. दरम्यान टोरंटो पियर्सन विमानतळावर उतरताना ते कोसळले. विमानात ८० प्रवासी होते, ज्यात ७६ प्रवासी आणि ४ क्रू मेंबर्स यांचा समावेश आहे. सर्व प्रवाशांना विमानातून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले, परंतु अपघातात अनेकजण गंभीर जखमी झाले.Toronto airport
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, हे विमान डेल्टा ब्रँड अंतर्गत एंडेव्हर एअरद्वारे चालवले जात होते. दरम्यान टोरंटो पिअर्सन येथे उतरताना वैमानिकाचे विमानावरील नियंत्रण सुटले आणि ते उलटले. दुर्घटनेची माहिती मिळचताच आपत्कालीन पथके तातडीने घटनास्थळी पोहोचली आणि सर्व प्रवाशांना विमानातून सुखरूप बाहेर काढण्यात आले.
या अपघातात १५ जण जखमी झाले. जखमींमध्ये एका मुलाचाही समावेश आहे. गंभीर जखमी झालेल्या ६० वर्षीय व्यक्तीला टोरंटोमधील सेंट मायकल रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर दुसऱ्या व्यक्तीला सनीब्रुक हेल्थ सायन्सेस सेंटरमध्ये हलवण्यात आले. टोरंटो पिअर्सन विमानतळावर बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. यावेळी अग्निशमन दलाचे जवान, पॅरामेडिक्स आणि बचाव पथकाचे सदस्य घटनास्थळी पोहोचले आणि बचाव कार्य सुरू केले.
पिअर्सन विमानतळाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक निवेदन प्रसिद्ध करून अपघाताची माहिती दिली “सर्व प्रवाशांची आणि क्रूची माहिती गोळा करण्यात आली आहे. अपघात गंभीर असला तरी परिस्थिती नियंत्रणात आहे.” असे सांगितले गेले आहे,
Another major plane crash plane overturns while landing at Toronto airport
महत्वाच्या बातम्या
- Ladaki Bahin scheme लाडकी बहीण लाभासाठी आता निकषांच्या चाळण्याच चाळण्या
- Bihar : दिल्लीनंतर बिहारमध्येही हादरे ; सिवानमध्ये ४.० तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले
- नुसत्या तुताऱ्या फुंकून दुष्काळी भागाला पाणी नाही देता येत; राधाकृष्ण विखे पाटलांचा शरद पवारांवर प्रहार!!
- Love Jihad : ‘लव्ह जिहाद’ कायद्याबाबत महाराष्ट्र सरकारच्या पावलाविरोधात आठवलेंची भूमिका