गोवा, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये हाहाकार माजविलेले तोक्ते चक्रीवादळ क्षमत नाही तोपर्यंत बंगालच्या उपसागरात आणखी एक नवीन चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्यामुळे २३ मेच्या दरम्यान आणखी एक चक्रवादळ तयार होण्याची भीती आहे.Another hurricane in the Bay of Bengal, the Meteorological Department warned
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : गोवा, महाराष्टÑ आणि गुजरातमध्ये हाहाकार माजविलेले तोक्ते चक्रीवादळ क्षमत नाही तोपर्यंत बंगालच्या उपसागरात आणखी एक नवीन चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्यामुळे २३ मेच्या दरम्यान आणखी एक चक्रवादळ तयार होण्याची भीती आहे.भारतीय हवामान विभागाने या चक्रीवादळाचे नाव यास असे ठेवले आहे.
हवामान विभागाच्या महासंचालक सुनिथा देवी म्हणाल्या, बंगालच्या उपसागरात पुढील आठवड्यात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र आणखी विस्तारण्याची शक्यता आहे.
त्यामुळे चक्रीवादळ तयार होऊ शकते. अरबी समुद्राचे आणि बंगालच्या उपसागरचे तापमान सरासरीपेक्षा एक ते दोन डिग्री सेल्सियसने वाढले आहे.
ही परिस्थिती चक्रीवादळ तयार होण्यासाठी अनुकुल आहे. बंगालच्या उपसागराचे तापमान ३१ अंश सेल्सियस आहे. त्याचबरोबर समुद्रातील इतरही परिस्थिती चक्रीवादळासाठी अनुकुल आहे.