• Download App
    आणखी एक हुंडाबळी : हुंड्यासाठी झारखंडमध्ये 24 वर्षीय विवाहितेला जिवंत जाळले, सासरचे लोक फरार | Another dowry victim: 24-year-old married woman burnt alive in Jharkhand for dowry, in-laws flee

    आणखी एक हुंडाबळी : हुंड्यासाठी झारखंडमध्ये 24 वर्षीय विवाहितेला जिवंत जाळले, सासरचे लोक फरार

    विशेष प्रतिनिधी

    हजारीबाग : झारखंड मधील हजारीबाग जिल्ह्यातील खिली येथे एका 24 वर्षीय विवाहितेला तिच्या सासरच्या लोकांनी जिवंत जाळून मारून टाकल्याची अतिशय दुखद घटना घडली आहे. याविरूध्द विवाहितेच्या भावाने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासरच्या लोकांच्या मागण्या विवाहिता पूर्ण करु शकली नाही, त्यामुळे विवाहितेचा छळ करण्यात येत होता. तिच्या सासरच्या माणसांनी तिला जाळून मारले आहे.

    Another dowry victim: 24-year-old married woman burnt alive in Jharkhand for dowry, in-laws flee

    बसंती देवी असे मृत विवाहितेचे नाव आहे. ही घटना रविवारी खिल्ली या खेडेगावात घडली आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पण त्यांच्या हाती विवाहितेचे काही उरलेले, जळलेले अवशेष हाती लागले. मृत बसंती दोन मुलांची आई होती. एक आठ वर्षांचा आणि एक तीन वर्षांत अशी दोन मुले तिला होती.


    हुंडाबळी : उत्तरप्रदेश मधील मन दुःखी करणारी घटना, घरातील इतर सदस्यांसमोर स्त्रीला मारहाण, पीडित स्त्रीचे निधन


    या घटनेनंतर तिचा नवरा अंगद साओ आपल्या घरच्यांसह आणि या दोन मुलांसह पळून गेला आहे. जेव्हा पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा अंगदचे नातेवाईक निर्मल राव हे फक्त घरात हजर होते. पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलेले आहे. हजिरिबाग मेडिकल कॉलेजमध्ये बसंती देवीचे जळलेले अवशेष पोस्टमॉर्टम करण्यासाठी पाठवलेले आहेत.

    मृत बसंती देवीच्या भावाने दिलेल्या माहितीनुसार, तिच्या सासरच्या लोकांनी पैशासाठी आणि टू व्हीलरच्या मागणीसाठी तिचा नेहमीच छळ केला. लग्नामध्ये देखील त्यांनी प्रचंड मोठा हुंडा घेतलेला होता. पण हुंड्याची मागणी काही कमी झाली नाही. ती वर्षांनुवर्षे वाढतच राहिली होती. त्यामुळे तिच्या बहिणीला जीव गमवावा लागला.

    हुंडा देणारे देतात, घेणारे आणि मागणारे बेशर्मपणे मागतातही आणि घेतातही. हुंडा देणे हा कायद्याने गुन्हा आहे. तरी देखील आजही सर्रास लग्न सोहळ्यात हुंडा देणे घेणे चालूच असते. ह्याचाच परिणाम म्हणजे बसंती देवी सारख्या स्त्रियांचे आयुष्य अर्ध्यावर संपून जाते. हे अतिशय दुखद आहे.

    Another dowry victim: 24-year-old married woman burnt alive in Jharkhand for dowry, in-laws flee

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

    रोजगाराच्या संधी वाढल्या, EPFOने फेब्रुवारीमध्ये १६.१ लाख सदस्य जोडले

    Pink e rickshaw महिलांसाठी महिलांद्वारे संचालित ‘पिंक ई-रिक्षा’!