• Download App
    मध्य प्रदेशात काँग्रेसला आणखी एक धक्का, आमदार निर्मला सप्रे यांचा भाजपात प्रवेश! Another blow to Congress in Madhya Pradesh MLA Nirmala Sapres entry into BJP

    मध्य प्रदेशात काँग्रेसला आणखी एक धक्का, आमदार निर्मला सप्रे यांचा भाजपात प्रवेश!

    भाजपमध्ये प्रवेश करण्यामागचं कारणही सांगितलं आहे, जाणून घ्या काय म्हणाल्या?

    विशेष प्रतिनिधी

    भोपाळ : मध्य प्रदेशात काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. बिना येथून काँग्रेसच्या आमदार झालेल्या निर्मला सप्रे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या सभेत निर्मला यांनी रहाटगडमध्ये भाजप सदस्यत्वाची शपथ घेतली.

    विधानसभा निवडणुकीत निर्मला सप्रे यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आणि दोन वेळा आमदार महेश राय यांचा 6000 हून अधिक मतांनी पराभव केला होता. जिल्ह्यातील आठ विधानसभा जागांपैकी बीना विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार निवडून आले.

    भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आमदार निर्मला सप्रे म्हणाल्या की, काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष जितू पटवारी यांनी महिलांच्या संदर्भात चुकीचे विधान केले होते, मी सुद्धा आरक्षित प्रवर्गातील महिला आमदार आहे आणि त्यांच्या बोलण्याने मी दुखावले आहे. भाजपमध्ये प्रवेश केला कारण येथे महिलांचा आदर केला जातो.

    Another blow to Congress in Madhya Pradesh MLA Nirmala Sapres entry into BJP

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    India Satellite : भारतात लवकरच थेट उपग्रहाद्वारे इंटरनेट; मस्क यांची स्टारलिंक 30-31 ऑक्टोबरला मुंबईत डेमो देणार

    Cricketer Azharuddin : माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन तेलंगणा सरकारमध्ये मंत्री होणार; 31 ऑक्टोबर रोजी शपथ घेणार

    राहुल गांधींनी मोदींच्या हाती आयता दिला मुद्दा; बिहारच्या निवडणुकीत “अपमान” तापला!!