मिलिंद देवरा नंतर आणखी एका जुन्या नेत्याने काँग्रेसला दिली सोडचिठ्ठी
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनी आज पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. सिद्दीकी म्हणाले की, मी तरुण असताना काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि आज ४८ वर्षांनी पक्ष सोडत आहे. ते म्हणाला की माझा हा प्रवास खूप छान होता. Another blow to Congress Baba Siddiqui quits the party
काही दिवसांपूर्वीच मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनात बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून, ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.