या कारणास्तव त्यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशीच पक्षाचा राजीनामा दिला.
विशेष प्रतिनिधी
पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. आज, अयोध्येतील राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशी, जेडीयूच्या आणखी एका बड्या नेत्याने पक्ष सोडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जेडीयूचे राज्य प्रवक्ते डॉ सुनील कुमार सिंह यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.Another big leader of Nitish Kumar also left JDU
यासंदर्भात त्यांनी बिहार प्रदेशाध्यक्ष उमेश कुशवाह यांना पत्र लिहून माहिती दिली आहे. वैयक्तिक कारणास्तव आपण पक्षाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे. प्रभू राम यांच्याबाबत पक्षाच्या भूमिकेवर ते चांगलेच नाराज होते. या कारणास्तव त्यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या दिवशीच पक्षाचा राजीनामा दिला.
काही दिवसांपूर्वी जेडीयूच्या आणखी एका मोठ्या नेत्याने पक्षाचा राजीनामा दिला होता. बांका येथील अंग किसान मोर्चाचे संयोजक आणि आस्था फाऊंडेशनचे संचालक कौशल कुमार सिंह यांनी १५ जानेवारी रोजी जेडीयूच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
आयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अभिजीत मुहूर्तावर श्री रामल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आणि 100 कोटी हिंदूंचे स्वप्न सत्यात उतरले. साडेपाचशे वर्षांचा कडवा संघर्ष खऱ्या अर्थाने कामी आला. शेकडो कार्य सेवकांच्या हौतात्म्याचे चीज झाले. लाखो कारसेवकांचे कष्ट फळाला आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अभिजीत मुहूर्तावर श्री रामल्लांचे वैदिक मंत्रोच्चारात प्राणप्रतिष्ठा केली. यावेळी गर्भगृहात सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्यासह 11 यजमान दांपत्ये उपस्थित होते.
Another big leader of Nitish Kumar also left JDU
महत्वाच्या बातम्या
- राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी राष्ट्रपतींनी पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र, महात्मा गांधींचा केला उल्लेख
- पश्चिम महाराष्ट्रातला “राम संपर्काचा” आकडा खरे तर पवार गटाला धडकी भरवणारा, पण तो गट नुसताच वाजवतोय तोंडाचा बेंडबाजा!!
- रामलल्ला प्राणप्रतिष्ठेचे मुख्य यजमान अयोध्येला कधी पोहोचणार, अयोध्येत किती वेळ घालवणार, जाणून घ्या पीएम मोदींचे शेड्युल
- अयोध्येत सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त, 10 हजार CCTVची नजर, 31 IPS आणि 25 हजार जवान तैनात