विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला पळवले, महाराष्ट्र गुंतवणुकीत खाली गेला, वगैरे अपप्रचाराचा धोशा उद्धव ठाकरे + शरद पवार आणि काँग्रेस यांनी लावला असताना प्रत्यक्षात महाराष्ट्राची परकीय गुंतवणुकीची आकडेवारी मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसत असून FDI चे वार्षिक टार्गेट महाराष्ट्राने 6 महिन्यांत पूर्ण केल्याचे स्पष्ट झाले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुलनात्मक आकडेवारी देऊन हे सिद्ध केले. Annual FDI target met in 6 months
फडणवीस यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर या संदर्भात सविस्तर पोस्ट लिहिली ती पोस्ट अशी :
महाराष्ट्र आता थांबणार नाही! वार्षिक सरासरीच्या 95 टक्के एफडीआय अवघ्या 6 महिन्यात… पुन्हा अतिशय आनंदाने सांगतो की, आपला महाराष्ट्र सातत्याने परकीय गुंतवणूक (एफडीआय) आकर्षित करण्यात अग्रेसर आहे. आता 2024-25 या आर्थिक वर्षातील सप्टेंबरला संपलेल्या दुसर्या तिमाहीची आकडेवारी आली आहे. त्यात अवघ्या सहा महिन्यात 1 लाख 13 हजार 236 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे.
गेल्या 4 वर्षांतील सरासरी पाहिली तर 1,19,556 कोटी रुपये वार्षिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. याचाच अर्थ संपूर्ण वर्षभराच्या 94.71 टक्के गुंतवणूक ही फक्त 6 महिन्यात आली आहे. मी महाराष्ट्राचे मन:पूर्वक अभिनंदन करतो… माझे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि संपूर्ण मंत्रिमंडळाच्या नेतृत्त्वात आपल्या महाराष्ट्राची ही घौडदौड अशीच कायम राहील, अशी ग्वाही देतो. 2020-21 : 1,19,734 कोटी 2021-22 : 1,14,964 कोटी 2022-23 : 1,18,422 कोटी 2023-24 : 1,25,101 कोटी 2024-25 (एप्रिल ते सप्टेंबर या 6 महिन्यात) : 1,13,236 कोटी #Maharashtra #FDI
Annual FDI target met in 6 months
महत्वाच्या बातम्या
- Amit Shah : काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता. आजही राहणार आहे, असं शाह यांनी ठामपणे सांगितले.
- विखे पाटील यांनी सांगितले कधी होणार धनंजय मुंडे यांचा राजीनामा
- America : अमेरिकेत आणखी एक मोठा हल्ला; न्यूयॉर्कच्या नाईट क्लबमध्ये गोळीबार, 11 जखमी
- Nitish Kumar : लालूंनी नितीश कुमारांना इंडि आघाडीत परतण्याची दिली ऑफर