विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Budget 2025 केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज आपला 8 वा अर्थसंकल्प सादर केला. यात त्यांनी आधीच जाहीर केल्याप्रमाणे शेतकरी युवक महिला आणि उद्योजक यांच्यासाठी विविध योजना जाहीर केल्या त्यामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी योजनांवर विशेष भर ठेवला. त्यांनी प्रधानमंत्री धनधान्य योजनेची घोषणा केली.Budget 2025
या योजनेअंतर्गत 100 जिल्ह्यांचा समावेश करण्यात येईल, जिथे उत्पादन कमी आहे. राज्यांसह पंतप्रधान धनधान्य योजना चालवली जाणार आहे. यामुळे 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा होईल असा विश्वास निर्मल सीतारमण यांनी व्यक्त केला आहे. ग्रामीण भागांच्या विकासासाठी राज्यांसह धोरण तयार करणार असंही त्यांनी सांगितलं आहे.
डाळींमध्ये स्वयंपूर्णतेसाठी धोरण
तूर, उडीद आणि मसूरसाठी 6 वर्षांचे विशेष अभियान. केंद्रीय संस्था 4 वर्षांत तूर, उडीद आणि मसूर खरेदी करतील. बिहारमध्ये मखाना बोर्ड स्थापन केले जाईल, भाज्या, फळांचे उत्पादन वाढवण्यासाठी राज्यांसोबत योजना आखली जाईल असंही त्यांनी सांगितलं आहे.
बिहारमध्ये मखाना बोर्डाचा प्रस्ताव
बिहारमध्ये मखाना बोर्ड प्रस्तावित आहे. मखानाच्या मार्केटिंगसाठी एक बोर्ड स्थापन केला जाईल. हे मखाना शेतकऱ्यांच्या हितासाठी केले जाईल. त्यांना सर्व सरकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठीही प्रयत्न केले जातील.
कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी देखील त्यांनी पाच वर्षांची विशेष योजना जाहीर केली यामध्ये कापू शेतकऱ्यांना थेट सरकारी मदत कापसाची विविध वाणे विकसित करण्यासाठी सरकारी तरतूद यांचा समावेश आहे. कापूस उत्पादकांना थेट टेक्सटाईल क्लस्टरशी जोडण्याचाही यात समावेश आहे