विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : सातारा लोकसभा मतदारसंघात छत्रपती उदयनराजे यांच्या उमेदवारीची थेट दिल्लीतून घोषणा झाली आहे. त्यामुळे आता साताऱ्यात कमळ विरुद्ध तुतारी असा सामना रंगणार असून उदयनराजेंच्या कमळ चिन्हावरील उमेदवारीमुळे नाशिक लोकसभा मतदारसंघातल्या घड्याळ चिन्हाचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे. Announcement of Udayanraj’s candidature directly from Delhi
सातारा लोकसभा मतदारसंघात बऱ्याच वर्षांनी म्हणजे तब्बल 25 वर्षांनी “घड्याळ” हे चिन्ह निवडणुकीच्या मतदान यंत्रावर असणार नाही. 1999 पासून सातारा लोकसभा मतदारसंघ काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीतून राष्ट्रवादीकडेच असायचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार घड्याळ चिन्हावर निवडणूक लढत असे. त्यात २००९ मध्ये स्वतः उदयनराजे हेच राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडून येऊन खासदार झाले होते. 2019 मध्ये त्यांनी आपल्या खासदारकीचे त्याच चिन्हावर रिपीटेशन केले होते. परंतु त्याच वर्षी उदयनराजे यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक भाजपच्या कमळ चिन्हावर लढवली होती, पण त्याच निवडणुकीदरम्यान शरद पवार पावसात भिजले आणि साताऱ्याची निवडणूक फिरली होती. उदयनराजेंना कमळ चिन्हावर पराभव पत्करावा लागला होता. तरी देखील उदयनराजेंना भाजपने राज्यसभेची जागा देऊन त्यांना पक्षात सामावून घेतले होते.
आता 2024 च्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजेंची उमेदवारी भाजपने कमळ चिन्हावर जाहीर केली आहे. उदयनराजे यांनी काहीच दिवसांपूर्वी दिल्लीत भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन आपल्या उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते, ते प्रयत्न आज फळाला आले. उदयनराजे पुन्हा एकदा साताऱ्यातून कमळ चिन्हावर आपले नशीब आजमावणार आहेत. त्यांची लढत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्याशी होणार असून शशिकांत शिंदे यांचे चिन्ह मात्र घड्याळ नसणार आहे, तर शिंदे हे शरद पवारांच्या पक्षाच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत.
साताऱ्याची जागा महायुतीच्या जागा वाटपात अजित पवारांच्या राष्ट्रवादीने स्वतःकडे मागितले होती, पण भाजपने आपल्या वाट्याची ती जागा राष्ट्रवादीला दिली नाही. उलट त्या जागेवर राष्ट्रवादीतूनच आलेले छत्रपती उदयनराजे यांना कमळ चिन्हावर उभे केले आहे. त्यामुळे आता नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटण्याची शक्यता असून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ चिन्हावर नाशिक मधून छगन भुजबळ यांची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे.
Announcement of Udayanraj’s candidature directly from Delhi
महत्वाच्या बातम्या
- सर्वोच्च न्यायालयाने श्रीकृष्ण जन्मभूमी खटल्यात सर्व पक्षकारांना ऑगस्टपर्यंत दिली मुदत!
- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ECI ची कारवाई, 43 दिवसांत कोट्यवधींची रोकड जप्त
- ‘ काहीही झाले तरी मणिपूरचे तुकडे होऊ देणार नाही’, अमित शाहांची इंफाळमध्ये घोषणा!
- बारामतीत कुठल्याही पवारांचा पराभव झाला, तर असे कोणते आकाश कोसळणार आहे??