विशेष प्रतिनिधी
नगर : दारूच्या व्यसनाच्या आहारी गेलेल्या माणसाला मत देऊ नका, अशा स्पष्ट शब्दांमध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर आज हल्लाबोल केला. नगर लोकसभा मतदारसंघासाठी राळेगणसिद्धीमध्ये मतदानाचा हक्क बजावल्यानंतर अण्णा हजारे यांनी माध्यमांशी संवाद साधला. या संवादात त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या दारू घोटाळ्यावर तुफानी हल्ला चढवला. Anna Hazare’s attack on Kejriwal
तुम्ही मत कोणत्याही पक्षाला द्या. पण ते मत चारित्र्यवान माणसाला द्या. चुकीच्या माणसाच्या हातात देशाची चावी देऊ नका. दारूच्या आहारी गेलेल्या व्यसनी माणसाला मत देऊ नका. ज्याच्या मागे ईडी लागली आहे, त्याला तर बिलकुल मत देऊ नका, अशा प्रखर शब्दांमध्ये अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवालांवर हल्ला चढवला. दारूचे व्यसन लागलेलेच नेते दारू घोटाळे करतात, असा टोलाही त्यांनी केजरीवालांना हाणला.
2012 मध्ये दिल्लीतल्या लोकपाल आंदोलनात अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवाल हे खांद्याला खांदा लावून लढत होते. परंतु नंतर केजरीवाल आम आदमी पार्टीच्या रूपाने राजकारणात शिरले. तिथून अण्णा हजारे आणि केजरीवाल यांच्यात मतभेद सुरू झाले. त्यानंतर अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांना सातत्याने धारेवर धरले. ते दारू घोटाळ्यामध्ये तुरुंगात गेल्यानंतर पहिल्यांदाच अण्णा हजारे यांनी मतदानाच्या चौथ्या टप्प्याच्या दिवशी प्रखर शब्दांमध्ये केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला.
Anna Hazare’s attack on Kejriwal
महत्वाच्या बातम्या
- फोडाफोडीच्या राजकारणावरून आज बोंबाबोंब, पण त्या राजकारणाचे तर शरद पवारच जनक!!
- पश्चिम बंगालमधील संदेशखळीमध्ये पुन्हा तणावाचे वातावरण!
- Alamgir Alam ED Summons : काँग्रेस नेते आलमगीर आलम यांना ‘ED’ने बजावले समन्स!
- अदानी + अंबानींविरोधात राहुल गांधींचा कंठशोष; पण पैसे दिल्यास काँग्रेस नेते मूग गिळून गप!!