विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अरविंद केजरीवालांनी एकेकाळी माझ्याबरोबर दारूबंदीच्या कामात आघाडीवर राहून काम केले, पण नंतर त्याच केजरीवालांनी मुख्यमंत्री झाल्यावर दिल्ली राज्याचे दारू धोरण ठरविले. त्यांच्या या कर्तुतीनेच त्यांना अटक झाली. आता इथून पुढे जे काय व्हायचं ते कायद्यानुसारच होईल, अशा शब्दांमध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवालांना ठोकून काढले, पण स्वतः केजरीवालांनी मात्र अटकेनंतर आपले जीवन देशाला समर्पित आहे, असे मोठ्या स्वातंत्र्यसैनिकाचा अविर्भाव आणत “महान” उद्गार काढले.Anna hazare targets kejriwal over liquor scandal, but kejriwal claimed his life is for the nation
रात्रीपासून सुरू झालेला अरविंद केजरीवालांच्या अटकेचा ड्रामा आज दिवसभर सुरूच राहिला. विरोधकांना केजरीवालांच्या रूपाने नवा हिरो मिळाला. मोदी सरकारवर तोफा डागत सगळे विरोधक केजरीवाल यांच्या भोवती गोळा झाले, पण त्याचा परिणाम भाजपवर होण्याऐवजी तो काँग्रेसवर झाला. इतके दिवस मेन ट्रॅक वर राहिलेली राहुल गांधींची गाडी साईडिंगला गेली.
आपल्या सकाळच्या नेहमीच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये संजय राऊत यांनी अण्णा हजारेंना जागे करा अशी “गर्जना” केली. त्या गर्जेनेने पाठोपाठ अण्णा हजारे जागे जरूर झाले, पण त्यांनी संजय राऊत यांच्या अपेक्षेबरहुकूम केजरीवालांची बाजू घेण्याऐवजी त्यांना ठोकून काढले. एकेकाळी हेच केजरीवाल माझ्याबरोबर दारूबंदीच्या आंदोलनात आघाडीवर राहून काम करत होते, पण नंतर ते दिल्लीचे मुख्यमंत्री बनल्यावर त्यांनी दारू धोरण ठरविले. त्यांच्या या कर्तुतीमुळेच त्यांना अटक झाली. आता जे काही व्हायचे ते कायद्यानुसारच होईल सरकार काय करायचे ते ठरवेल, अशा शब्दांमध्ये अण्णा हजारेंनी केजरीवालांचे वाभाडे काढले.
पण अण्णांनी वाभाडे काढूनही केजरीवाल बधले नाहीत. उलट निवडणुकीच्या तोंडावर आपल्याला अटक झाल्याचा अपेक्षित परिणाम साधला जाताच केजरीवाल खुश झाले आणि त्यांनी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकाचा अविर्भाव आणत आपण तुरुंगात राहिलो तरी, आपले संपूर्ण जीवन तर देशासाठी समर्पित आहे, असे “उस्फूर्त” उद्गार काढले. या उद्गारातून केजरीवाल यांनी आपले निर्ढावलेपण सिद्ध केले.
Anna hazare targets kejriwal over liquor scandal, but kejriwal claimed his life is for the nation
महत्वाच्या बातम्या
- पृथ्वीराज चव्हाणांच्या पक्षनिष्ठेला अखेर हायकमांडकडून “न्याय”; काँग्रेसची महाराष्ट्रातील प्रचारसूत्रे बाबांच्या हाती!!
- मध्य प्रदेशातील धार येथील भोजशाळेचे ASI सर्वेक्षण उद्यापासून सुरू होणार
- निवडणुकीच्या तोंडावर अटकेचा केजरीवालांचा कांगावा, पण त्यांनीच आधी टाळली होती ED ची तब्बल 9 समन्स!!
- दिल्ली मद्य घोटाळ्याशी संबंधी, ईडीचे पथक पोहचले केजरीवालांच्या घरी!