ठाकरे सरकारच्या सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीला परवानगी देण्याच्या निर्णयावर जोरदार टीका होत आहे. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनीही सुपर मार्केटमध्ये दारू विक्री करण्याच्या सरकारच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यांनी याला दुर्दैवी म्हटले.Anna Hazare anger over the government decision to sell wine in supermarkets, said- Where will this decision take the state?
वृत्तसंस्था
मुंबई : ठाकरे सरकारच्या सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीला परवानगी देण्याच्या निर्णयावर जोरदार टीका होत आहे. त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनीही सुपर मार्केटमध्ये दारू विक्री करण्याच्या सरकारच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यांनी याला दुर्दैवी म्हटले.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी आज सांगितले की, “सुपर मार्केटमध्ये वाइन विक्रीला परवानगी देण्याचा सरकारचा निर्णय दुर्दैवी आहे. व्यसनमुक्तीसाठी काम करणे हे सरकारचे कर्तव्य आहे, पण ते आर्थिक फायद्यासाठी निर्णय घेत आहे, त्यामुळे मद्याचे व्यसन लोकांना लागेल हे पाहून मला वाईट वाटते.”
यावेळी अण्णा हजारे म्हणाले, “एकीकडे राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हिताच्या गप्पा मारते. वाइन म्हणजे दारू नाही असेही म्हटले जाते. हा निर्णय राज्याला कुठे घेऊन जाणार? हा खरा प्रश्न आहे. राज्यघटनेनुसार, अंमली पदार्थ, नशेची औषधे आणि दारू यांपासून लोकांना परावृत्त करणे आणि त्यांना शिक्षित करणे हे सरकारचे कर्तव्य असले पाहिजे. मात्र सरकार आर्थिक फायद्यासाठी दारूविक्रीचे निर्णय घेत आहे. वर्षभरात 1000 अब्ज लिटर दारू विक्रीचे उद्दिष्ट ठेवलेले सरकार प्रत्यक्षात काय साध्य करणार? हा मोठा प्रश्न आहे.
महाराष्ट्र सरकारने सुपरमार्केट आणि किराणा दुकानांमध्ये मद्यविक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला होता. ठाकरे सरकारच्या या निर्णयावरून विरोधक त्यांच्यावर निशाणा साधत असतानाच दुसरीकडे सर्वसामान्य जनताही या निर्णयावर नाराज आहे.
Anna Hazare anger over the government decision to sell wine in supermarkets, said- Where will this decision take the state?
महत्त्वाच्या बातम्या
- दोघांचे भांडण तिसऱ्याचा तोटा!!; मुंबई महापालिकेत भांडण शिवसेना-भाजपचे; तोट्यात काँग्रेस!!
- सुशील खोडवेकर यांना कोरोनाची लागण; टीईटी घोटाळ्यातील आरोपीची ‘ व्हिसी’ सुनावणी
- आर्थिक सर्वेक्षण लोकसभेत सादर, आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये जीडीप 8 ते 8.5 टक्के राहण्याचा अंदाज, वाचा सविस्तर…
- Weather Alert : राज्यात पुढील दोन दिवस कडाक्याची थंडी, पुढच्या आठवड्यात पावसाचीही शक्यता