• Download App
    Anmol Bishnoi Arrested NIA Baba Siddique Murder Extradition Photos Videos Investigation बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी अनमोल बिष्णोईला अटक, भारतात येताच एनआयएची कारवाई

    Anmol Bishnoi : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी अनमोल बिष्णोईला अटक, भारतात येताच एनआयएची कारवाई

    Anmol Bishnoi

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : Anmol Bishnoi  राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी वॉन्टेड गँगस्टर अनमोल बिष्णोईला भारतात दाखल होताच एनआयएने अटक केली. अमेरिकेतून हद्दपार केल्यानंतर तो बुधवारी दिल्लीत दाखल झाला होता. विशेष न्यायालयाने त्याला ११ दिवसांची एनआयए कोठडी सुनावली.Anmol Bishnoi

    तुरुंगात असलेला गँगस्टर लाॅरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल विष्णोईला गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते आणि मंगळवारी त्याला देशातून बाहेर काढण्यात आले. माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची १२ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री मुंबईतील वांद्रे भागात त्यांचा मुलगा झिशानच्या कार्यालयासमोर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्या प्रकरणी अनमोल वॉन्टेड होता. याशिवाय एप्रिल २०२४ मध्ये बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या निवासस्थानी झालेल्या गोळीबाराच्या घटनेत आणि पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येप्रकरणीही तो वॉन्टेड आहे. महाराष्ट्रासह दिल्ली, पंजाब, हरयाणा व राजस्थानात अनमोलविरोधात ११ हून जास्त खटले दाखल आहेत.Anmol Bishnoi



    बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंधित २६ जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. या निर्घृण हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी कठोर अशा महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याची (मकोका) कलमे लावली आहेत. या प्रकरणात अनमोल बिष्णोई, शुभम लोणकर आणि झिशान मोहम्मद अख्तर यांची नावे वॉन्टेड आरोपी म्हणून घेण्यात आली होती.

    २०२२ पासून फरार असलेला अमेरिकेतील अनमोल गुजरातच्या साबरमती तुरुंगात असलेला लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ आहे. लाॅरेन्सच्या टेरर सिंडिकेटशी संबंधित अटक झालेला अनमोल १९ वा आरोपी आहे. २०२०-२०२३ या कालावधीत गोल्डी ब्रार आणि लॉरेन्सच्या दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याबद्दल मार्च २०२३ मध्ये एनआयएने अनमोलवर आरोपपत्र दाखल केले होते.

    ११ दिवसांची कोठडी

    एनआयएने अनमोलला कडक सुरक्षेत पटियाला हाऊस कोर्टात हजर केले. १५ दिवसांची रिमांड मागितली. ११ दिवसांची मंजूर झाली.

    Anmol Bishnoi Arrested NIA Baba Siddique Murder Extradition Photos Videos Investigation

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi : PM मोदी जी-20 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला जाणार, अनेक द्विपक्षीय बैठकांना उपस्थित राहणार

    Mohan Bhagwat : सरंसघचालक म्हणाले- भारताला हिंदू राष्ट्र घोषित करणे आवश्यक नाही, संस्कृतीने आधीच हे उघड केले

    Nitish Kumar : नितीशकुमार एनडीएच्या नेतेपदी, आज दहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार