Anju Sehwag : माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागची बहीण अंजू सेहवाग यांनी आज आम आदमी पक्षात प्रवेश केला. यावेळी आपचे अनेक नेते उपस्थित होते. आपचे राष्ट्रीय सरचिटणीस पंकज गुप्ता आणि आमदार सोमनाथ भारती यांनी अंजू सेहवाग यांना पक्षाचे सदस्यत्व दिले आहे. Anju Sehwag sister of former cricketer Virender Sehwag, joins Aam Aadmi Party
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागची बहीण अंजू सेहवाग यांनी आज आम आदमी पक्षात प्रवेश केला. यावेळी आपचे अनेक नेते उपस्थित होते. आपचे राष्ट्रीय सरचिटणीस पंकज गुप्ता आणि आमदार सोमनाथ भारती यांनी अंजू सेहवाग यांना पक्षाचे सदस्यत्व दिले आहे.
अंजू या मदनगीर वॉर्डातून काँग्रेसच्या नगरसेविका होत्या. त्या शिक्षिका आहेत. यावेळी अंजू म्हणाल्या की, सीएम केजरीवाल यांनी केलेल्या कामामुळे प्रेरित होऊन मी माझ्या सर्व समर्थकांसह आपमध्ये सामील झाले आहे.
आम आदमीमध्ये सामील झाल्यानंतर अंजू सेहवाग म्हणाल्या की, आप हा असा पक्ष आहे ज्याने सर्व प्रोटोकॉल तोडले आहेत. पक्ष जी कोणती जबाबदारी देईल, ती आम्ही पूर्ण निष्ठेने पार पाडू, असेही त्या म्हणाले. अंजू सेहवाग यांनी यापूर्वी 2012ची दिल्ली MCD निवडणूक दक्षिणपुरी एक्स्टेंशनमधून काँग्रेस उमेदवार म्हणून लढवली होती. त्यांनी भाजपच्या आरती देवी यांचा ५५८ मतांनी पराभव केला होता.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या चंदीगड महापालिका निवडणुकीत AAP ने विजय मिळवला आहे. पंजाबमध्ये पक्षाचा प्रभाव वाढला आहे. शिवाय पुढील सरकार स्थापनेचा दावाही केला जातोय. पंजाब, गोवा, उत्तराखंड, उत्तर प्रदेशमध्येही पक्ष आपल्या पक्षाच्या प्रचारात गुंतला आहे.
Anju Sehwag sister of former cricketer Virender Sehwag, joins Aam Aadmi Party
महत्त्वाच्या बातम्या
- पुणे पोलिस दलातील महिला पोलिस निरीक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या
- WATCH : पाच टक्के जीएसटीमुळे हळद व्यापारी अस्वस्थ सांगली बाजारपेठेत मोठी उलाढाल होते
- मोठी बातमी : भारताकडून ब्रह्मोस खरेदी करणार फिलिपाईन्स, दक्षिण चीन समुद्रात चीनच्या दादागिरीला देणार आव्हान
- महाबळेश्वर पर्यटनासाठी खास बससेवेला प्रारंभ सातारा एसटी डेपोत नवीन पर्यटन बस दाखल
- मुहूर्त ठरला : मार्चमध्ये होणार १८ महापालिकांच्या निवडणुका, १ फेब्रुवारीपासून आचारसंहिता, मुंबई-औरंगाबाद वगळल्याची चर्चा