• Download App
    एएनआयने चोरला स्मृति इराणी यांचा फोटो, माझा फोटो आणि क्रेडीट दुसºयाचे का असा केला इराणींनी सवाल|ANI steals Smriti Irani's photo, my photo and credit

    एएनआयने चोरला स्मृति इराणी यांचा फोटो, माझा फोटो आणि क्रेडीट दुसऱ्याचे का असा केला इराणींनी सवाल

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री स्मृति इराणी यांचा फोटो चक्क चोरला गेला आहे. विशेष म्हणजे एएनआय या प्रसिध्द वृत्तसंस्थेने ही चोरी केली आहे. ही चोरी स्मृति इराणी यांनीच ट्विट करून उघड केली.योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशात भाजप सरकारचा भव्य शपथविधी पार पडलाय. त्यानंतर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे एक ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.ANI steals Smriti Irani’s photo, my photo and credit

    स्मृती इराणी यांनी यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधीदरम्यानचा फोटो क्लिक केला होता. त्यांच्या या फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, राजनाथ सिंह, नितीन गडकरी आणि जेपी नड्डा असे भाजपचे बडे नेते एका फ्रेममध्ये दिसत आहेत. मात्र, त्यांनी काढलेल्या या फोटोचे क्रेडीट दुसºयाच कुणाला तरी देण्यात आले. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.



    स्मृती इराणी यांनी 26 मार्च रोजी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर हा फोटो पेस्ट केला होता. ज्याचे कॅप्शन आहे माझे कुटुंब, भाजप परिवार. याच फोटोत पंतप्रधान मोदींसह भाजपचे इतर दिग्गज नेते दिसत आहेत. मात्र त्यांनी क्लिक केलेल्या या फोटोला क्रेडीट हे एएनआय या वृत्तसंस्थेचे देण्यात आले आहे.

    स्मृती इराणी यांनी प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, मी फोटो काढला, क्रेडीट एएनआयला गेले. यासोबत एक दु:खी इमोजीही शेअर केला आहे. स्मृती इराणींच्या या ट्विटला उत्तर देताना एएनआयच्या संपादक स्मिता प्रकाश यांनी लिहिले, बड़े-बड़े शहरों में ऐसी छोटी-छोटी बातें हो जाती हैं सेनोरिटा. यासोबत त्यांनी एक हार्टचे इमोजी शेअर केले..

    स्मिता प्रकाश यांच्या या ट्विटला उत्तराला उत्तर देताना स्मृती इराणी यांनी लिहिले, सेनोरिटा बडे देशचे मोठे संपादक असे बोलले तर बाकीच्या लोकांचे काय होईल. एएनआयसोबत पीटीआयने असेच केले असते तर? त्यानंतर मात्र एनएयच्या संपादकांचा सूर बदलला. आणि त्यानंतर त्यांनी स्मृती इराणी यांची माफी मागितली.

    ANI steals Smriti Irani’s photo, my photo and credit

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका