• Download App
    Santpeeth निवडणुकीच्या धामधुमीत राजकीय वाद रंगतच असतात

    Santpeeth : संतपीठावरील संचालकांच्या पात्रतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्याने वारकरी संप्रदायाकडून संताप

    Santpeeth

    Santpeeth निवडणुकीच्या धामधुमीत राजकीय वाद रंगतच असतात. पण धार्मिक विषय राजकारणाचे हत्यार बनवल्यावर लोकांकडून संताप व्यक्त होतो. भोसरी मतदारसंघात सध्या असाच एक नवा वाद निर्माण झाला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या वक्तव्याने हा वाद उफाळून आला आहे. संतपीठावरील संचालकांचे ‘कॅलिबर’ काय? असे म्हणत संत तुकाराम महाराज संतपीठावरील संचालकांच्या पात्रतेवरच त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले. अजित गव्हाणे यांनी जाहीर सभेत वक्तव्य केल्याने वारकरी सांप्रदाय आणि शिक्षण क्षेत्रातून संताप व्यक्त होत आहे. तर प्रथम आपण हे वक्तव्य काय ते पाहू…Santpeeth



    तर भोसरीतील एका सभेमध्ये अजित गव्हाणे यांनी विद्यमान आमदार आणि महायुतीचे उमदेवार महेश लांडगे यांना संतपीठाच्या मुद्यावर लक्ष्य केले. भाषणाला जोर चढला आणि ‘संतपीठावर ज्यांना संचालक केले आहे.. त्याचा इतिहास चेक करा… त्यांचे कॅलिबर तुमच्या लक्षात येईल’ असा आरोप केला. त्यामुळे वारकरी सांप्रदाय आणि शिक्षण क्षेत्रात उलटसुलट चर्चा सुरू झाली. विशेष म्हणजे आज या संतपीठामध्ये १ हजार ६०० हून अधिक विद्यार्थी संतसाहित्य आणि आधुनिक शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. त्यामुळे त्यांच्या पालकांमध्येही संभ्रम निर्माण झाला.

    वास्तविक, संतपीठाचे पदसिद्ध अध्यक्ष व मुख्य संचालक महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह आहेत. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकाच संतपीठाचे संचालन करते. यासह संतपीठावर महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती महामंडळाचे अध्यक्ष आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे वंशज, संतसाहित्याचे गाढे अभ्यासक प्रा. डॉ. सदानंद मोरे (देहुकर), आळंदी देवस्थान ट्रस्टचे माजी सदस्य, शिक्षणक्षेत्रातील तज्ञ आणि संपादक, लेखक, अर्थतज्ञ असा लौकीक असलेले डॉ. अभय टिळक यांचा संतपीठाच्या संचालक मंडळामध्ये समावेश आहे. त्यामुळे अजित गव्हाणे आता तुकोबारायांचे वंशज, आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांचे ‘कॅलिबर’ म्हणजे पात्रता तपासणार आहेत का? असा संतत्प सवाल उपस्थित केला जात आहे.

    संतपीठ ही मूळ संकल्पना स्व. दत्ता साने यांची आहे. त्या संकल्पनेला मूर्तरुप आमदार महेश लांडगे यांनी दिले. संतपीठाच्या प्रस्तावापासून सल्लागार नियुक्ती, निविदा प्रक्रिया, वर्क ऑर्डर, भूमिपूजन आणि लोकार्पण आणि आता संतपीठाचे यशस्वीपणे संचालन सुरू आहे. मात्र, अजित गव्हाणे यांच्यासारख्या सुसंस्कृत आणि अभ्यासू नेता चुकीच्या माहितीच्या आधारे आक्षेपार्ह वक्तव्य केले. ‘‘तुका म्हणे ऐशा नरा… मोजुनी माराव्या पैजारा..’’ अशा संतत्प प्रतिक्रिया वारकरी सांप्रदाय आणि शिक्षण क्षेत्रातून येत आहेत. त्यामुळे संतपीठाच्या मुद्यावर गव्हाणेंचा ‘सेल्फ गोल’ झाला, असे निरीक्षण राजकीय जाणकारांनी नोंदवले आहे.

    दिघीतील ज्येष्ठ नेते आणि वारकरी सांप्रदायातील माननीय व्यक्तीमत्व ह.भ.प. दत्ताआबा गायकवाड यांनी तर यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना बोला रामकृष्ण हरी… तुतारीला पाठवा घरी असे म्हटले आहे.

    दिघी येथे भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये दिघीतील ज्येष्ठ नेते आणि वारकरी सांप्रदायातील माननीय व्यक्तीमत्व ह.भ.प. दत्ताआबा गायकवाड यांनी दिघीच्या विकासाच्या मुद्यावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षावर प्रहार करतानाच ‘‘रामकृष्ण हरी’’ म्हणण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला नाही, असे खडे बोल जाहीर सभेत सुनावले. जो पक्ष आणि त्यांचा नेता रामाला, कृष्णाला,आमच्या देव-देवतांना मानत नाही. आमच्या स्वामी समर्थांचा, आमच्या गजानन महारजांचा अवमान केला जातो. त्याबद्दल आवक्षर न काढणाऱ्यांच्या तोंडी रामकृष्ण हरी शोभत नाही म्हणून..‘‘ बोला रामकृष्ण हरी… तुतारीला आता पाठवा घरी’’ असा अप्रत्यक्ष ठराव वारकरी सांप्रदायाने केला आहे. वारकरी सांप्रदाय कदपि महाविकास आघाडीसोबत राहणार नाही. कारण, भले त्यासी देवू कासेची लंगोट… नाठाळाच्या माथी हाणू काठी…ही संत तुकोबारायांची शिकवण आहे, अशी संतप्त टीका हभप दत्ताआबा गायकवाड यांनी केली आहे.

    Questioning the qualifications of directors on Santpeeth

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Goldie Brar : गोल्डी ब्रारने भाजपचे माजी खासदाराकडे मागितला पाच कोटींचा प्रोटेक्शन मनी

    UPI transactions : दोन हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर GST लादण्याची कोणतीही योजना नाही

    Mithun Chakraborty : मिथुन चक्रवर्ती यांनी बंगाल पोलिसांना म्हटले ‘मूक प्रेक्षक’