प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील पाचव्या दिवशी अंगणवाडी सेविकांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 20 % वाढ आणि 20000 नव्या अंगणवाडी सेविका भरती करणार असल्याची मोठी घोषणा बालकल्याण विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे. Anganwadi Sevika salary to be increased by 20 % and new recruitment of 20000 in anganwadis
मंगलप्रभात लोढा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्यांपर्यंत 20000 नव्या अंगणवाडी सेविकांची भरती होणार असून त्यांच्या मानधनात 20 % वाढ केली जाणार आहे. तसेच अंगणवाडी सेविकांना नवीन मोबाईल देण्यासाठी 150 कोटी खर्च केले जाणार आहेत. याशिवाय महापालिका क्षेत्रात 200 कंटेनर अंगणवाड्या सुरू करणार असून अंगणवाडी भाड्डेदर वाढवला जाणार आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी प्रश्नोतराच्या तासात अंगणवाडी सेविकांचा विषय होता. यावेळी विरोधकांनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनाचा प्रश्न उचलून धरला. तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या प्रश्नावर योग्य ते व समाधानकारक उत्तर बालविकास मंत्री लोढा यांनी न दिल्याने विरोधकांनी सभात्याग केला होता. यावेळी अजित पवार यांनी राज्यातील अंगणवाडी सेविकांना 15000 रुपये मानधन आणि मदतनीसांना 10000 रुपये मानधन देणार का? असा सवाल केला होता.
Anganwadi Sevika salary to be increased by 20 % and new recruitment of 20000 in anganwadis
महत्वाच्या बातम्या
- मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला, मॉर्निंग वॉकवेळी लोखंडी रॉड, स्टम्पने मारहाण; रुग्णालयात दाखल
- 5 राज्यांतील पोटनिवडणुकीचे निकाल : काँग्रेसने 6 पैकी 3 जागा जिंकल्या, महाराष्ट्रातील कसबापेठची जागा 28 वर्षांनंतर भाजपने गमावली
- लोकसभा निवडणूक एकट्याने लढवणार TMC : विरोधी ऐक्याच्या प्रचाराला सुरुंग, ममता म्हणाल्या- आमची आघाडी जनतेशीच