• Download App
    आंग सॅन स्यू की अखेर न्यायालयात हजर, म्यानमारच्या विशेष न्यायालयात सुनावणी सुरु।Ang san sue kee appers in court

    आंग सॅन स्यू की अखेर न्यायालयात हजर, म्यानमारच्या विशेष न्यायालयात सुनावणी सुरु

    वृत्तसंस्था

    बँकॉक : म्यानमारमध्ये लष्करी राजवट लागू झाल्यानंतर तीन महिन्यांनी प्रथमच लोकशाहीवादी नेत्या, पंतप्रधान आंग सॅन स्यू की या न्यायालयासमोर हजर झाल्या. त्यांच्यावर सहा आरोप ठेवण्यात आले आहेत. Ang san sue kee appers in court

    १९९१ रोजी शांततेचे नोबेल पारितोषिक जिंकणाऱ्या ७५ वर्षी स्यू की या म्यानमारमध्ये लष्करी राजवट आल्यानंतर अनेक फौजदारी खटल्यांचा सामना करत आहे. स्यू की या सहा आरोपप्रकरणी न्यायालयात हजर झाल्या.



    यापैकी दोन गुन्हे हे २०२० च्या निवडणूक प्रचारादरम्यानचे कोरोनाचे प्रोटोकॉल मोडल्याप्रकरणीचे आहेत. याशिवाय अंगरक्षकांसाठी बेकायदापणे वॉकी टॉकी आयात करणे आणि नागरिकांत तणाव निर्माण होईल, अशी माहिती पसरवणे, परवाना न घेता रेडिओचा वापर करणे यासारखे आरोप ठेवण्यात आले आहेत.

    सुनावणीपूर्वी त्यांनी वकिलांशी अर्धा तास चर्चा केली. तसेच स्यू की यांच्या वकिलांनी निर्वाचित सरकारचे अध्यक्ष विन मिंट यांचीही भेट घेतली. विन मिंट हे देखील अटकेत आहेत. स्यू की यांच्यावर अनेक फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मागच्या वेळी त्यांना न्यायालयात एका व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून हजर करण्यात आले होते. तसेच त्यांना वकिलांशी बोलू देखील दिले नव्हते.

    नॅशनल लीग डेमोक्रॅटिक पक्ष हा नागरिकांसमवेत आहे. यापुढेही पक्ष लोकांसाठी लढत राहील, असे त्या म्हणाल्या. स्यू की यांची तब्येत चांगली असल्याचे वकिलाने सांगितले.

    Ang san sue kee appers in court

    Related posts

    Nirmala Sitharaman : GST सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेत 2 लाख कोटी येतील; अर्थमंत्री म्हणाल्या- दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होतील, सामान्य लोकांकडे जास्त पैसे शिल्लक राहतील

    EC Voters : देशभरात बिहारप्रमाणे SIR; अर्ध्याहून अधिक मतदारांना कागदपत्रे मागणार नाहीत

    Rahul Gandhi in the press conference : राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत उल्लेख केलेल्या ‘राजुरा’ मतदारसंघात कोण जिंकलं ?