विशेष प्रतिनिधी
हैदराबाद : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगमोहन रेड्डी यांच्या भगिनी वाय.एस. शर्मिला गुरुवारी त्यांच्या नवीन पक्षाची घोषणा करणार आहेत. त्यामुळे राज्यातील राजकारणाला वेगळी किनार मिंळण्याची शक्यता राजकीय निरीक्षक वर्तवित आहेत.Andhra to support his brother. Y S. Sharmila will form a new party
राज्यात आता बहीण व भावाचे वेगवेगळे पक्ष असणार आहेत.त्यांचे वडील आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय.एस. राजशेखर रेड्डी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून त्या नवीन पक्षाची घोषणा करणार आहेत.
पक्षाच्या कार्यक्रमासह झेंड्याचे अनावरणही त्या करणार आहेत.शर्मिला यांनी तेलंगणमधील राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्या नंतर मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्यावर निशाणा साधला होता.
त्याचवेळी त्यांनी युवकांच्या बेरोजगारीच्या मुद्यावरून तीन दिवस उपोषण केले होते. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांत देखील लक्ष घातले होते. तेलंगण व आंध्र प्रदेशमधील पाणी वाटपावर शर्मिला यांनी टिप्पणी देखील केली होती.
Andhra to support his brother. Y S. Sharmila will form a new party
महत्त्वाच्या बातम्या
- काश्मींरमध्ये अवघ्या सात महिन्यांत ६६ दहशतवाद्यांचा खातमा
- सतत जजमेंटल होवू नका
- खटल्यामधून माघारीपूर्वी न्या. चंदा यांनी ममतादीदींना ठोठावला पाच लाखांचा दंड
- नव्या अवकाश स्थानकाबाहेर चिनी अंतराळवीरांचा पहिला स्पेस वॉक
- आपल्या कपाटात पैसे, म्हणजे गुंतवणुक नव्हे