• Download App
    अंधेरी पोटनिवडणूक : भाजप मधल्या फटीचा माध्यमांना 'शोध'; पण नानांचे MCA बिनविरोध निवडणुकीत पवार + शेलार युतीकडे बोटAndheri east Byelection : Nana patole targets sharad Pawar + Ashish shelar over MCA unopposed election

    अंधेरी पोटनिवडणूक : भाजप मधल्या फटीचा माध्यमांना ‘शोध’; पण नानांचे MCA बिनविरोध निवडणुकीत पवार + शेलार युतीकडे बोट

    प्रतिनिधी

    मुंबई : अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याच्या मुद्द्यावर भाजपमध्ये कशी फट पडत आहे, कसे दोन गट तयार झाले आहेत, अशा बातम्या कथित सूत्रांच्या हवाल्याने विविध माध्यमे देत असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र वेगळाच गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी उघडपणे अंधेरी पोटनिवडणुकीचा संबंध मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बिनविरोध निवडणुकीशी अर्थात शरद पवार + आशिष शेलार युतीशी लावला आहे. या दोन्ही नेत्यांची नावे नानांनी घेतलेली नाहीत, पण एमसीए अर्थात मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक म्हणजे पैशाचा खजिना असलेली निवडणूक. ती बिनविरोध होत असताना कोण कोणाकडे जातो आणि नंतर ज्येष्ठ नेते पत्रकार परिषद घेऊन अंधेरीची निवडणूक बिनविरोध करायला सांगतात यात कुठेतरी संशयाचा वास येतो, असा गौप्यस्फोट नानांनी पटोले यांनी केला आहे. Andheri east Byelection : Nana patole targets sharad Pawar + Ashish shelar over MCA unopposed election

    राज ठाकरे आणि शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा हवाला देत अंधेरीची पोटनिवडणूक आमदाराच्या वारसासाठी बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते. उद्धव ठाकरेंनी या आवाहनानंतर फक्त शरद पवारांचे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती टिकवण्याचे प्रयत्न केल्याबद्दल आभार मानले होते.



     

    पण नाना पटोले यांनी एबीपी माझाशी बोलताना मात्र या पोटनिवडणुकीच्या बिनविरोधाचे सगळे राजकीय बिंगच फोडले आहे. त्यांनी उघडपणे बिनविरोध निवडणुकीच्या प्रयत्नाचा संबंध मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बिनविरोध निवडणुकीशी लावून त्यामध्ये शरद पवार + आशिष शेलार वगैरे नेते असे एकत्र आले याचा उल्लेख केला आहे.

    माध्यमांनी मात्र आशिष शेलार हे अंधेरी पोटनिवडणुकीसाठी आग्रही आहेत, पण फडणवीसांवर देवेंद्र फडणवीसांवर निवडणूक बिनविरोध करण्याचा दबाव आहे, अशा बातम्या दिल्या आहेत. प्रत्यक्षात नानांनी मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि अंधेरी पोटनिवडणूक यातल्या बिनविरोधाचे राजकीय बिंग फोडून दाखविले आहे.

    नाना पटोले यांनी शरद पवारांचे नाव न घेता जो भाजप संपूर्ण देश विकून खातो आहे, त्यांच्याबरोबर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत कोण चालले आहे, हे महाराष्ट्राची जनता उघड्या डोळ्यांनी पाहते आहे, असे शरसंधान साधले आहे. नानांच्या या वक्तव्यामुळे अंधेरी पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या बाजूने एक वेगळा ट्विस्ट आला आहे.

    Andheri east Byelection : Nana patole targets sharad Pawar + Ashish shelar over MCA unopposed election

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!