• Download App
    अंदमानातल्या कोठडीत फक्त 10 दिवस राहून दाखवा; Andaman at jail only stayed for 10 days amit shah statement

    अंदमानातल्या कोठडीत फक्त 10 दिवस राहून दाखवा; सावरकरांचा अवमान करणाऱ्या राहुल गांधींना अमित शाहांचे आव्हान

    प्रतिनिधी

    अहमदाबाद : भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात येताच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी टीआरपी साठी वीर सावरकरांचा अवमान केला. त्यावरून मोठा वादंग उसळला असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी थेट राहुल गांधी यांना आव्हान दिले आहे. वीर सावरकर यांचा जे अवमान करत आहेत, त्यांनी, सावरकर जिथे 10 वर्षे राहिले आणि शिक्षा भोगली अंदमानच्या सेल्युलर जेलच्या कोठडीत 10 दिवस राहून दाखवावे, असे आव्हान अमित शाह यांनी राहुल गांधींना दिले. वीर सावरकरांच्या देशभक्तीचा अर्थ समजून घेतला तर हा मुद्दा निकाली निघेल. वीर सावरकरांवर अशी भडक टिप्पणी करण्याचा अधिकार कोणालाही नाही. हे लोक जनतेसमोर गेल्यावर जनता त्यांना समजावेल, असा टोलाही शाह यांनी लगावला. Andaman at jail only stayed for 10 days amit shah statement



    CAA कायद्याविषयी मोठे विधान 

    सध्या गुजरात निवडणुकीची धामधूम सुरू आहे. भाजपचे नेते, केंद्रीय गृहमंत्री शाह हे गुजरातमध्येच ठाण मांडून आहेत. या दरम्यान शाह यांनी पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी थेट CAA कायद्याच्या विषयाला हात घातला. देशात दोन वर्षांपूर्वी ज्या कायद्यामुळे मुसलमानांनी आकांडतांडव केला होता तो CAA कायद्याच्या अंमलबजावणीला तात्पुरती स्थगिती आणली. त्यामुळे हा कायदा आता होणार नाही, अशी मुस्लिमांची धारणा झाली असली तरी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हा भ्रमाचा भोपळा फोडला आहे. त्यांच्या विधानाने मुस्लिमांच्या चिंता वाढली आहे.

    जे लोक CAA कायदा लागू न होण्याचे स्वप्न पाहत आहेत ते चूक करत आहेत. कारण CAA हे या देशाचे वास्तव आणि कायदा आहे. हा कायदा लवकरच लागू होईल, कोरोनामुळे याला विलंब होत आहे, आम्हाला फक्त काही नियम बनवायचे आहेत आणि त्याची अंमलबजावणी केली जाईल, असे अमित शाह म्हणाले.  या कायद्याअंतर्गत बांगलादेश, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातील सहा धार्मिक अल्पसंख्याकांना (हिंदू, बौद्ध, जैन, पारशी, ख्रिश्चन आणि शीख) भारताचे नागरिकत्व देण्याचा प्रस्ताव आहे.

    Andaman at jail only stayed for 10 days amit shah statement

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    IPL 2025 : आयपीएल २०२५चे नवीन वेळापत्रक जाहीर, १७ मे पासून सामना सुरू होणार

    Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजस्थानात पुन्हा ड्रोन दिसले; होशियारपूरमध्ये 5-7 स्फोट, ब्लॅकआऊट

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!