• Download App
    अनंतकुमार यांच्या मुलीने जनता दलाचे कौतुक केले आणि कुमारस्वामी यांनी त्यांच्या कुटुंबाला पक्षात येण्याचे आमंत्रण दिले|Anant Kumar's daughter praises Janata Dal and Kumaraswamy invites her family to join the party

    अनंतकुमार यांच्या मुलीने जनता दलाचे कौतुक केले आणि कुमारस्वामी यांनी त्यांच्या कुटुंबाला पक्षात येण्याचे आमंत्रण दिले

    विशेष प्रतिनिधी

    बंगळुरू : भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते अनंतकुमार यांच्या मुलीने जनता दलाचे कौतुक करून राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. एका ट्विटच्या कौतुकाने हुरळून जाऊन जनता दलाचे (धर्मनिरपेक्ष) अध्यक्ष कुमारस्वामी यांनी अनंतकुमार यांच्या कुटुंबाला पक्षात सामील होण्याचे आवाहन केले आहे. जे. पी. नड्डा यांच्या भाजपाला नीट ओळखा असा सल्लाही त्यांनी दिला आहे.Anant Kumar’s daughter praises Janata Dal and Kumaraswamy invites her family to join the party

    अनंतकुमार यांची मुलगी विजया हिने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की कर्नाटकातील राजकारण खरोखरच मनोरंजक आहे. जनता दल (धर्मनिरपेक्ष) खूप मजबूत राजकीय ताकद आहे. या ट्विटनंतर नेटकऱ्यांनी विजयाला चांगलेच ट्रोल केले.



     

    एक किंवा दोन लोकसभा मतदारसंघात जनता दल मजबूत राजकीय शक्ती आहे, अशी टीका केली. यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या प्रत्येक गोष्ट केवळ जागांच्या दृष्टीने मोजली जाऊ शकत नाही.

    त्यानंतर जेडीएस नेते आणि माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी विजयाचे आभार मानले. माज्यासाठी त्या बहिणीसारख्या आहेत. विजया आणि भाजपाच्या उपाध्यक्ष असलेल्या त्यांच्या आई तेजस्विनी यांनी जनता दलात सहभागी व्हावे, असे आमंत्रण दिले. जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखालील भाजपा आपण ओळखले नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

    कर्नाटकामध्ये नुकतेच राजकीय सत्तांतर झाले आहे. बीएस येडियुरप्पा यांच्या जागी बसवराज बोम्मई यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. येडियुरप्पा यांच्यासह, दिवंगत अनंत कुमार यांनी राज्यातील भाजपच्या वाढीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. सत्तांतरानंतर दोन दिवसांतच विजया अनंतकुमार यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेमुळे कर्नाटकातील राजकीय वतुर्ळात चर्चा सुरू झाली आहे.

    Anant Kumar’s daughter praises Janata Dal and Kumaraswamy invites her family to join the party

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य