• Download App
    Anant Ambani अनंत अंबानीने लालबागच्या राजाला अर्पण

    Anant Ambani : अनंत अंबानीने लालबागच्या राजाला अर्पण केला 20 किलोचा सोन्याचा मुकुट!

    किंमत ऐकून तुम्ही सुद्धा व्हाल आवाक!


    मुंबई : देशभरात गणेश उत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. या दरम्यान मुंबईतील सर्वात प्रसिद्ध लालबागच्या राजाची पहिली झलकही समोर आली आहे. यावेळी लालबागचा राजाची छायाचित्रे गुरुवारी प्रथमच समोर आली. लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी देशभरातून आणि जगभरातून भाविक मुंबईच्या लालबागेत येतात.

    बाप्पाच्या दरबारात मोठमोठ्या व्यक्तींनी नमन केले. या पार्श्वभूमीवर देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जाणारे रिलायन्स फाऊंडेशनचे मालक मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी ( Anant Ambani  ) यानेही लाल बागचा राजाला एक मोठी भेट दिली आहे.



    अनंत अंबानीने लालबागच्या राजाच्या दरबारात नतमस्तक होऊन सोन्याचा अत्यंत मौल्यवान मुकुटही अर्पण केला. अनंत अंबानीने अर्पण केलेल्या या मुकुटाची सर्वत्र चर्चा होत आहे. नुकतेच अनंत अंबानीने राधिक मर्चंटसोबत लग्न केले. यानंतर त्याचा हा पहिलाच गणेश महोत्सव आहे. लग्नानंतर अनंत अंबानीने लालबागचा राजाला 20 किलो सोन्याचा मुकुट अर्पण केला आहे.

    अनंत अंबानींनी दान केलेल्या 20 किलो सोन्याच्या मुकुटाच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर त्याची बाजारातील किंमत 15 कोटी रुपये आहे. गुरुवारी लालबागचा राजाच्या पुतळ्याचे अनावरण झाले तेव्हा त्यांना हा मौल्यवान मुकुट देण्यात आला होता.

    Anant Ambani offered a 20 kg gold crown to the King of Lalbagh

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानने 60 वेळा अमेरिकेशी संपर्क साधला होता; लॉबिंग फर्मचा दावा

    Turkman Gate : दिल्लीत मध्यरात्री पोलीस-MCD पथकावर दगडफेक; मशिदीजवळ अवैध बांधकाम हटवण्यासाठी पोहोचले होते; अश्रुधुराचे गोळे सोडले

    Mamata Banerjee : SIR दरम्यान अमानवीय वागणुकीविरोधात न्यायालयात जाणार; CM ममतांचा आरोप- या प्रक्रियेमुळे अनेक लोकांचा मृत्यू