• Download App
    हात-पाय नसलेल्याचा गाडी चालवितानाचा व्हिडीओ पाहून आनंद महिंद्रा यांचे मन द्रवले, नोकरीच दिली ऑफर|Anand Mahindra's heart melted after watching the video of him driving a car without limbs, he was offered a job

    हात-पाय नसलेल्याचा गाडी चालवितानाचा व्हिडीओ पाहून आनंद महिंद्रा यांचे मन द्रवले, नोकरीच दिली ऑफर

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : हात आणि पाय नसलेल्या एक व्यक्ती खास बनविलेली गाडी चालवित असल्याचे पाहून उद्योगपती आनंद महिंद्रा यांचे मन द्रवले आहे. त्यांनी या व्यक्तीला थेट नोकरीची ऑफर दिली आहे.Anand Mahindra’s heart melted after watching the video of him driving a car without limbs, he was offered a job

    आनंद महिंद्र यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये एक असा व्यक्ती ज्याला ना हात आहेत ना पाय आहेत, तो त्याने बनवलेली जुगाड गाडी चालवताना दिसतो आहे. या गाडीला स्कूटीचं इंजिन असून ती मॉडिफाय केलेली गाडी आहे. एका व्यक्तीने या दिव्यांगाची मुलाखत घेतली आहे.



    त्याने गाडी चालवून देखील दाखवली आहे. आनंद महिंद्रांनी त्याचा व्हिडीओ शेअर करत कौतुक केलंय. इतकंच नव्हे तर त्याला नोकरीचीही ऑफर दिली आहे.या व्हिडीओमध्ये तो व्यक्ती सांगतो की, मला बायको आणि दोन लहान मुले आहेत. त्यामुळे मी बाहेर कामाला जातो.

    गेल्या पाच वर्षांपासून मी ही गाडी चालवतो. त्याचा व्हिडीओ काढून त्याच्या या जिद्दीबाबत कौतुक केल्यानंतर त्या दिव्यांग व्यक्तीने एक निर्मळ स्मितहास्य देऊन देवाचे आभारही मानले.हा व्हिडीओ आनंद महिंद्रांनी ट्विटरवर शेअर करत म्हटलंय की, हा व्हिडीओ कुठे शूट केलाय,

    ते त्यांना माहिती नाही. आज माझ्या टाइमलाइनवर मला हा मिळाला. हा व्हिडीओ किती जुना आहे किंवा तो कुठला आहे हे माहित नाही, परंतु या व्यक्तीने मला आश्चर्यचकित केले आहे. ज्या व्यक्तीने केवळ आपल्या अपंगत्वाशी दोन हात केला नाहीये तर त्याच्याकडे जे काही आहे त्याबद्दलही तो कृतज्ञ आहे. राम, लास्ट माईल डिलिव्हरीसाठी त्याला बिझनेस असोसिएट बनवू शकतोस का? अशी विचारणाही त्यांनी आपल्या सहकाऱ्याला केली आहे.

    Anand Mahindra’s heart melted after watching the video of him driving a car without limbs, he was offered a job

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार