• Download App
    ‘सुपर ३०’ चे जनक आनंद कुमार आता देणार जपानी विद्यार्थ्यांना गणिताचे धडे |Anand Kumar will teach for japani students

    ‘सुपर ३०’ चे जनक आनंद कुमार आता देणार जपानी विद्यार्थ्यांना गणिताचे धडे

    टोकियो – आयआयटीमधील प्रवेशासाठी ‘सुपर ३०’ या संस्थेद्वारे निवडक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणारे गणितज्ज्ञ आनंद कुमार हे आता जपानमधील विद्यार्थ्यांनाही गणिताचे धडे देणार आहेत.Anand Kumar will teach for japani students

    शालेय शिक्षणाच्या पद्धतीत अमूलाग्र बदल करण्याच्या हेतूने जपानमध्ये सुरु झालेल्या ‘आम ॲम बिसाइड्‌स यू’ या कंपनीबरोबर आनंद कुमार यांनी करार केला आहे.प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमतेनुसार त्याला ऑनलाइन शिक्षण देण्याचा या कंपनीचा प्रयत्न असून त्यासाठी त्यांनी जगभरातील अनेक चांगल्या शिक्षकांची करार केला आहे.



    कोरोना काळात जपानमधील दोन स्टार्ट कंपन्यांनी आनंद कुमार यांच्याशी करार केला होता. त्याच्या यशानंतर आता ‘आय ॲम बिसाइड्‌स यू’ या कंपनीनेही त्यांच्याशी करार केला आहे.‘आय ॲम बिसाइड्‌स यू’ ही कंपनी गेल्याच वर्षी स्थापन झाली आहे.

    आनंद कुमार यांची जपानी विद्यार्थ्यांमधील लोकप्रियता पाहून या कंपनीने आनंद कुमार यांच्या ज्ञानाचा आणि शिकविण्याच्या कौशल्याचा लाखो विद्यार्थ्यांना फायदा मिळवून देण्याच्या हेतूने त्यांच्याशी करार केला आहे, असे या कंपनीने निवेदनात म्हटले आहे.

    Anand Kumar will teach for japani students

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Mamata Banerjee : सीएम ममता म्हणाल्या- शहा एक दिवस मोदींचे मीर जाफर होतील; ते काळजीवाहू पंतप्रधानांसारखे वागत आहेत

    Rahul Gandhi : राहुल गांधींनी कोलंबियातील कॉफी शॉपचा व्हिडिओ शेअर केला; म्हणाले- तिथे कॉफी एक पीक नाही, तर त्यांची ओळख

    PM मोदी म्हणाले- भारताला एकेकाळी 2G साठी संघर्ष करावा लागला; आज सर्व जिल्ह्यांत 5G कनेक्टिव्हिटी