वृत्तसंस्था
प्रयागराज : Mahakumbh गंगा-यमुना आणि अदृश्य सरस्वतीच्या संगम काठावर जगातील सर्वात मोठ्या धार्मिक साेहळ्यातील पहिले अमृतस्नान सुरक्षित पार पडले. सनातन शक्ती आणि भव्यता प्रदर्शित करत सर्व 13 आखाड्यांनी संगमात डुबकी घेतली. मंगळवारी पहाटे 5:15 वाजता महानिर्वाणी आखाड्यापासून सुरू झालेला स्नान सोहळा सायंकाळी उशिरा पूर्ण झाला. मंगळवारी मध्यरात्रीपर्यंत संत, तपस्वीसंह साडेतीन कोटी भाविकांनी स्नान केले.Mahakumbh
सोमवारी रात्रीपासून आखाड्यांमध्ये इष्टदेव व निशाणांची पूजा सुरू झाली. टिळा व अस्थिकलशांनी सजलेल्या संन्याशांच्या मिरवणुकीत अग्रभागी आखाड्यांचे झेंडे, घोड्यांवर ढोल वाजवणारे साधू आणि देवांच्या पालख्या होत्या. मागे महामंडलेश्वरांचे रथ, आखाड्यांचे पदाधिकारी होते. मागे नागा व साधूंची फौज त्रिशूळ, भाले, गदा आणि तलवारी घेऊन निघाली. शैव आखाड्यांनी हर-हर महादेव, वैष्णवांनी जय सीताराम, राधेश्याम आणि निर्मल-उदासीन आखाड्यांनी, जो बोले सो निहालच्या गजरात संगमात प्रवेश केला. प्रशासनाने हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केल्याने वातावरण भारावले. काही ठिकाणी भाविक बॅरिकेड्स ओलांडून यात्रेत सामील झाले. घोडेस्वार पोलिसांना संगम घाटावर उतरून भाविकांना हटवावे लागले. पुढील अमृतस्नान 29 जानेवारीला मौनी अमावास्येला होत आहे.
An ocean of faith in Mahakumbh; 3.5 crore devotees take a bath in one day, crowd from dawn to midnight
महत्वाच्या बातम्या
- Basavaraj Teli आष्टीचा जावई येथे आणून बसविला, एसआयटीचे प्रमुख बसवराज तेलीवर वाल्मीक कराडच्या बायकोचा आरोप
- Delhi : दिल्लीतील ४०० शाळा बॉम्बने उडवण्याची धमकी देणाऱ्याला अटक
- Sanjay Raut : संजय राऊतांना अचानक झाली भाजपची आठवण अन् काँग्रेसला दिलेला सल्ला
- PM Modi : IMDच्या १५० व्या स्थापना दिनी पंतप्रधान मोदींनी सुरू केले ‘मिशन मौसम’