महिलेने लिहिलेली सुसाईड नोट सापडली असून, त्यामध्ये अनेक गंभीर आरोप केलेले आहे.
विशेष प्रतिनिधी
धारवाड : ऑस्ट्रेलियातील एका अनिवासी भारतीय महिलेने बेळगाव जिल्ह्यात नुकतीच आत्महत्या केली होती. पोलिसांनी शुक्रवारी सांगितले की, महिलेने तिच्या सुसाईड नोटमध्ये ऑस्ट्रेलियन अधिकारी आणि सिडनीमधील काही लोकांवर गंभीर आरोप केले आहेत. धारवाड येथील प्रियदर्शनी लिंगराज पाटील (४०) यांनी २० ऑगस्ट रोजी बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्तीजवळ आत्महत्या केली. गोरावणकोल्ला गावातील मलप्रभा नदीत या महिलेने उडी मारून आत्महत्या केली होती. तिचा मृतदेह जिल्ह्यातील नवलतीर्थ गावात आढळून आला. An NRI woman finally committed suicide after being unable to rescue both children from the custody of the Australian government
ही महिला ऑस्ट्रेलियाहून बंगळुरूला पोहोचली होती. तिने बसने हुबळी आणि नंतर बेळगाव गाठले. प्रियदर्शिनी पाटील या मुलांच्या ताब्यावरुन ऑस्ट्रेलियन अधिकाऱ्यांशी कायदेशीर लढा देत होत्या. त्यांचा मुलगा अमर्त्य यास आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागले. हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान, मुलावर काही दुष्परिणाम दिसून येऊ लागले होते. प्रियदर्शनी यांनी विचारणा केली असता रुग्णालयाने प्रतिसाद दिला नाही, त्यानंतर त्यांनी रुग्णालयाविरोधात सरकारकडे तक्रार केली होती.
प्रियदर्शिनी यांनी दावा केला होता की रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर मुलांची काळजी घेण्यास असमर्थ असल्याचा आरोप केला होता आणि नंतर सरकारने त्यांच्या दोन मुलांचा ताबा घेतला. प्रियदर्शिनी यांनी या निर्णयाला विरोध केला असला तरी त्यांना मुलांचा ताबा मिळू शकला नाही. प्रियदर्शिनी यांनी ऑस्ट्रेलियन सरकारकडे आपल्या मुलांचे नागरिकत्व परत घेऊन त्यांना उपचारासाठी भारतात नेण्याची मागणीही केली होती, मात्र त्यांना सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नव्हता.
आपल्या मुलांना हिसकावून घेतल्याने होणारा त्रास आणि त्यांच्या आरोग्याच्या समस्यांमुळे प्रियदर्शिनी यांना अखेर हे टोकाचे पाऊल उचलावे लागले, असा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. प्रियदर्शनी यांनी त्यांच्या वडिलांना लिहिलेल्या डेथ नोटमध्ये, “आमच्या जीवाला धोका आहे. माझी मुले आणि पती लिंगराज यांच्या जीवासाठी मला जीवन संपवावे लागत आहे. मी माझ्या कुटुंबाच्या भल्यासाठी मृत्यू स्वीकारत आहे.
2021 पासून आजपर्यंत DCJ (ऑस्ट्रेलियाचा समुदाय आणि न्याय विभाग) ने माझे कुटुंब उद्ध्वस्त केले आहे. सिडनीतील वर्ले स्ट्रीटमधील रहिवाशांनी आम्हाला त्रास दिला आहे. याशिवाय त्यांनी एका पोलिस अधिकाऱ्याच्या कुटुंबीने त्यांचा छळ केल्याचा आरोपही केला आहे. एवढेच नाही तर त्यांनी हेही म्हटले आहे की, त्यांच्या घराला पुरवले जाणारे पाणी विषारी होते. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
An NRI woman finally committed suicide after being unable to rescue both children from the custody of the Australian government
महत्वाच्या बातम्या
- नरसिंह राव हिंदुत्ववादी, तर मग सरदार पटेल, श्यामाप्रसाद मुखर्जी, पुरुषोत्तमदास टंडन, के. एम. मुन्शी, कृपलानी हे कोण होते??
- पंतप्रधान मोदी बंगळुरूत पोहोचले, ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांच्या अभिनंदनासाठी कमांड सेंटरमध्ये जाणार!
- ईडीच्या कारवाईला घाबरून तिकडे गेले; पवारांची मुश्रीफांवर नाव न घेता टीका; अजित पवारांचेही नाव टाळले!!
- ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ अभियानाच्या शिबिराला भरघोस प्रतिसाद