वृत्तसंस्था
नवी दिल्ली : सनातन धर्म मलेरिया डेंगी कोरोना सारखा आहे त्याचे निर्मूलन केले पाहिजे असे बेलगाम वक्तव्य करणाऱ्या तामिळनाडूचा मंत्री उदयनिधी स्टालिन यांचा शिरच्छेद करण्यासाठी अयोध्येतील महंत परमांसाचार्य यांनी 10 कोटींचे इनाम जाहीर केले आहे.An insult to Sanatana Dharma; 10 crore reward of Mahant Paramansacharya for Udayanidhi’s beheading!!
उदयनिधी स्टालिन यांनी भारतातल्या आणि भारताबाहेरच्या 100 कोटी सनातन धर्मियांचा अपमान केला आहे. याची शिक्षा त्यांना झालीच पाहिजे. त्यामुळे मी त्यांच्या शिरच्छेदासाठी 10 कोटींचे इनाम जाहीर करतो. तेवढी रक्कम पुरेशी वाटली नाही तर मी इनामाची रक्कम वाढवेन पण उदयनदी स्टाईलला शिक्षा झालीच पाहिजे, असे वक्तव्य महंत परमांसाचार्य यांनी केले आहे.
उदयनिधी स्टालिन याच्या वक्तव्याबद्दल संपूर्ण देशभर प्रचंड संताप आहे. काँग्रेस नेते करण सिंह यांनी त्यांचा निषेध केला आहे. पण “इंडिया” आघाडीत मात्र ममता बॅनर्जी यांच्यापासून अनेकांनी बोटचेपी भूमिका घेतली आहे. उदयनिधी यांनी कुठल्याही धर्माचा अपमान करू नये, एवढेच वक्तव्य ममता बॅनर्जींनी केले, पण त्यांनी उदयनिधींचा निषेध केला नाही. “इंडिया” आघाडीतल्या बहुतेक सर्व पक्षांनी या स्वरूपाची बोटचेपी भूमिका घेतली आहे.
या पार्श्वभूमीवर महंत परमांसाचार्यांनी उदयनिधी स्टाईल यांच्या शिरच्छेदासाठी 10 कोटींचे इनाम ठेवले आहे.
An insult to Sanatana Dharma; 10 crore reward of Mahant Paramansacharya for Udayanidhi’s beheading!!
महत्वाच्या बातम्या
- एक देश एक निवडणूक ही राष्ट्रहिताची असेल’ प्रशांत किशोर यांनी मोदी सरकारच्या भूमिकेचे केले समर्थन
- सनातन धर्माचा अपमान करणाऱ्या उदयनिधीवर ममतांची बोटचेपी भूमिका!!
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला दहिहंडी व सार्वजनिक गणेशोत्सव पूर्वतयारीचा आढावा
- लाठीमाराचे आदेश आम्ही दिल्याचे सिद्ध करा, आम्ही राजकारण सोडू; अन्यथा तुम्ही राजकारण सोडा!!; अजितदादांचे आव्हान