वृत्तसंस्था
कीव : रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात एका भारतीय विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागल्याच्या काही दिवसांनंतर युक्रेनच्या राजधानी शहरात एका भारतीय विद्यार्थ्याला गोळी लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. An Indian student has been hospitalised after he was shot with a bullet in the capital city of Ukraine
एएनआयशी बोलताना नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे राज्यमंत्री जनरल व्हीके सिंग यांनी गुरुवारी पोलंडच्या रझेझो विमानतळावर ही माहिती दिली.
जनरल (निवृत्त) सिंग यांनी सांगितले की, “कीवमधील एका विद्यार्थ्याला गोळी लागल्याची माहिती मिळाली आणि त्याला तात्काळ कीव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.” “भारतीय दूतावासाने याआधी सर्वांनी कीव सोडले पाहिजे, असे प्राधान्याने स्पष्ट केले होते. युद्धाच्या प्रसंगी बंदुकीची गोळी कोणाचाही धर्म आणि राष्ट्रीयत्व पाहत नाही,” असेही ते पुढे म्हणाले.
हे विद्यार्थी सध्या युक्रेनमधून युद्धग्रस्त देश सोडून भारतात सुरक्षित परतण्यासाठी पोलंडच्या सीमेवर पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. चार केंद्रीय मंत्री, हरदीप सिंग पुरी, ज्योतिरादित्य एम सिंधिया, किरण रिजिजू आणि जनरल (निवृत्त) व्हीके सिंग हे युक्रेनला लागून असलेल्या देशांमधील स्थलांतराच्या प्रयत्नांवर देखरेख करत आहेत.