• Download App
    An Indian driver will do development work in his village after winning the lottery in Dubai

    दुबईत जिंकलेल्या लॉटरीतून भारतीय ड्रायव्हर करणार आपल्या गावात विकासकामे

    वृत्तसंस्था

    दुबई : लॉटरीतून श्रीमंत होण्याचे नशीब फार कमी जणांना लाभते. पण यूएईमध्ये राहणार्‍या भारतीय वंशाच्या एका ड्रायव्हरचं नशीब चमकलंय आणि लॉटरीतून त्याला 33 कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. पण हे बक्षीस तो स्वतःसाठी न वापरता त्यातून चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन करून आपल्या गावाचा आणि शेजारच्या गावाचा विकास करणार आहे. An Indian driver will do development work in his village after winning the lottery in Dubai

    ३३ कोटी रुपये मिळाले

    खलीज टाईम्सच्या वृत्तानुसार दुबईमध्ये राहणारा ३१ वर्षीय अजय ओगुला हा तरुण एका रात्रीत कोट्यधीश झाला आहे. अमीरात ड्रॉ मध्ये त्याला ३३ कोटी रुपये मिळाले आहेत. अजय म्हणतो की, त्याचा अजूनही विश्वास बसत नाही की तो एवढी मोठी रक्कम जिंकला आहे. त्याने जेव्हा आपल्या गावी फोन करुन ही बातमी सांगितली तेव्हा त्यांच्या कानावर त्यांचा विश्वास बसला नाही. त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

    पहिल्यांदाच लॉटरीचे तिकीट घेतले

    अजय ओगुला हा चार वर्षांपूर्वी दक्षिण भारतातून संयुक्त अरब अमिरात येथे नोकरीसाठी आला होता. सध्या तो ज्वेलरीच्या कंपनीत ड्रायव्हर म्हणून काम करत होता. त्याला त्यासाठी ३२०० दरमहा म्हणजे साधारण ७२,००० पगार मिळत होता. आता त्याला नोकरी करायची गरज राहिली नाही. उलट तोच अनेकांना नोकरी देऊ शकेल.

    आधी अजयला वाटलं की लॉटरी लागली ठीक आहे! परंतु पैसे जास्त मिळणार नाही, कमी रकमेची लॉटरी लागली असेल. पण जेव्हा त्याला खरी रक्कम कळली तेव्हा त्याला खूप आनंद झाला. अजयने आयुष्यात पहिल्यांदाच लॉटरीचं तिकीट घेतलं होतं आणि पहिल्या पाळीतच त्याला लॉटरी लागली. एक – दोन कोटी नव्हे तर तब्बल ३३ कोटी! या पैशांतून अजय एक चॅरिटी ट्रस्ट स्थापन करणार आहेत, जेणेकरुन त्यांचे आणि त्यांच्या शेजारील गावाच्या काही मूलभूत गरजा भागवू शकतील.

    An Indian driver will do development work in his village after winning the lottery in Dubai

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!