बेरासियाच्या डूमरिया गावात बांधलेल्या धरणाजवळ हेलिकॉप्टरचे लँडिंग करण्यात आले.
विशेष प्रतिनिधी
भोपाळ : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथे भारतीय हवाई दलाच्या ALH ध्रुव हेलिकॉप्टरने भोपाळजवळ इमर्जन्सी लँडिंग केले. प्राथमिक माहितीनुसार चालक दल सुरक्षित आहे. आयएएफच्या सूत्रांनी सांगितले की, हेलिकॉप्टर लँडिंगच्या वेळी त्यामध्ये 6 सैनिक होते. An Indian Air Force ALH Dhruv helicopter made a precautionary landing near Bhopal.
तामिळनाडू : कुन्नूरमध्ये पर्यटकांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली; ८ ठार, ३५ जखमी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टरला भोपाळपासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका शेतात उतरावे लागले. गावकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर बराच वेळ धरणावर चकरा मारत राहिले, त्यानंतर ते शेतात उतरले.
मिळालेल्या माहितीनुसार, बेरासियाच्या डूमरिया गावात बांधलेल्या धरणाजवळ हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचे लँडिंग करण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हेलिकॉप्टर शेतात उतरताना स्पष्ट दिसत आहे. व्हिडिओमध्ये हेलिकॉप्टरभोवती हवाई दलाचे जवानही दिसत आहेत. यासोबतच हेलिकॉप्टर पाहण्यासाठी ग्रामस्थांनीही मोठी गर्दी केली होती. सध्या हवाई दलातील सैनिक इंजिनीअर आणि तंत्रज्ञांच्या प्रतीक्षेत आहेत.
An Indian Air Force ALH Dhruv helicopter made a precautionary landing near Bhopal
महत्वाच्या बातम्या
- ”आपल्या कुटुंबातील हे कार्ट असे निपजल्याचे बघून बाळासाहेबांना खूप दुःख झाले असेल”
- राहुल गांधी ओबीसी सचिवांविषयी विचारतात, पण काँग्रेसच्या राजवटीत ओबीसी सचिव होते किती??, वाचा!!
- तामिळनाडू : कुन्नूरमध्ये पर्यटकांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली; ८ ठार, ३५ जखमी
- महत्त्वाची बातमी : दोन हजाराच्या नोटा बदलण्याची तारीख वाढवली, RBIने जारी केले नवीन परिपत्रक