लॅन्सेट या प्रतिष्ठित वैद्यकीय पत्रिकेने (मेडीकल जर्नल) नेहमीचे संकेत सोडून राजकीय भाष्य करत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात लेख लिहिला आहे. चीनच्या भारविरोधी अजेंड्याचा भाग असल्याचे पुरावे समोर आले आहेत. लॅन्सेटच्या अशिया विभागाच्या संपादक चीनी महिला असून त्यांनी बिजींगमध्ये बसून हा लेख लिहिला असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे कॉँग्रेसकडून मोदींवर टीका करण्यासाठी लॅन्सेटमधील लेखाचाच आधार घेण्यात येत आहे.An anti-Modi article in the Lancet was written from China, a woman editor in Beijing wrote it
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : लॅन्सेट या प्रतिष्ठित वैद्यकीय पत्रिकेने (मेडीकल जर्नल) नेहमीचे संकेत सोडून राजकीय भाष्य करत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात लेख लिहिला आहे. चीनच्या भारविरोधी अजेंड्याचा भाग असल्याचे पुरावे समोर आले आहेत.
लॅन्सेटच्या अशिया विभागाच्या संपादक चीनी महिला असून त्यांनी बिजींगमध्ये बसून हा लेख लिहिला असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे कॉँग्रेसकडून मोदींवर टीका करण्यासाठी लॅन्सेटमधील लेखाचाच आधार घेण्यात येत आहे.
लॅन्सेट हे वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित मेडीकल जर्नल मानले जाते. वैद्यकीय संशोधन, माहिती यामध्ये असते. राजकीय भाष्य करण्याची लॅन्सेटची परंपरा नाही. परंतु, भारताचा प्रश्न येतो तेव्हा मात्र लॅन्सेटमध्ये हे संकेत पाळले जात नाहीत, हे दिसून आले आहे.
लॅन्सेटच्या ८ मे रोजी प्रसिध्द झालेल्या अंकात पूर्णपणे राजकीय पूर्वग्रहातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारे संपादकीय लिहिले गेले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतामध्ये रुग्णांची संख्या वाढली याला मोदी जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला.
मोदींनी घेतलेल्या निर्णयांवरही टीका करण्यात आली होती. लॅन्सेटमध्ये मोदींना लक्ष्य करण्याची ही पहिली वेळ नाही. यापूवीर्ही भारतामध्ये काश्मीरबाबतचे कलम ३७० रद्द करण्यात आल्यावर लॅन्सेटमधून सरकारचा निषेध करण्यात आला होता.
लॅन्सेटच्या ताज्या अंकातील मोदींविरोधातील संपादकीयाबाबत धक्कादायक खुलासा झाला आहे. लॅन्सेटच्या अशिया विभागाच्या संपादक हेलेना हुई वांग यांनी हे लिहिले आहे. त्या बिजींग येथे राहतात.
लॅन्सेट इतर वेळी त्याच्या विश्वासार्हतेसाठी ओळखले जाते. परंतु, या संपादकीयामध्ये चुकीची माहिती, चुकीचे संदर्भ देण्यात आले आहेत. अगदी सामान्य माणसालाही हे समजू शकेल. मात्र, यातील खटकणारा मुद्दा म्हणजे संपूर्ण देशात लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, हे आग्रहाने आणि वारंवार सांगितले आहे.
भारतातील कोरोना बाधित आणि कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंच्या आकडेवारीबाबतही संशय व्यक्त करण्यात आला आहे. कोरोनाचा उंचावलेला आलेख खाली येण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, हे सांगताना केंद्रीय पातळीवर लॉकडाऊनची गरज व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे भारतातील अनेक भागात कमी अधिक प्रमाणात लॉकडाऊन आहेच. अर्थव्यवस्थेचा विचार केल्यास देशपातळीवरील लॉकडाऊनचा पर्याय व्यवसहार्य नाही याची सर्वांनाच कल्पना आहे. तरीही लॅन्सेटने वारंवार त्याचाच उल्ले केला आहे.
कोणत्याही पुराव्याशिवाय आम्ही छापत नाही असे म्हणणाऱ्या लॅन्सेटने या संपादकीयमध्ये भारतात १० लाख लोक कोरोनाने मृत्यूमुखी पडतील असे म्हटले आहे. यामुळे भारतात धास्ती निर्माण होईल,
याचा विचारही त्यांनी केला नाही. केवळ लॅन्सेटच नव्हे तर अनेक आंतरराष्ट्रीय माध्यमसंस्था भारताबाबत पूर्वग्रहदूषित मजकूर देत आहेत. ब्लूमबर्गसारख्या संस्थांचाही त्यामध्ये समावेश आहे.