• Download App
    मध्य प्रदेशात विदिशाजवळ उदयपूरात आढळली प्राचीन नंदी मूर्ती; अधिक उत्खननात मोठे मंदिर सापडण्याची शक्यता An ancient Nandi idol found at Udaipur near Vidisha in Madhya Pradesh; Further excavations are likely to reveal a larger temple

    मध्य प्रदेशात विदिशाजवळ उदयपूरात आढळली प्राचीन नंदी मूर्ती; अधिक उत्खननात मोठे मंदिर सापडण्याची शक्यता

    प्रतिनिधी

    विदिशा : मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यात नंदी महाराजांची प्राचीन मूर्ती सापडली आहे. ग्रामस्थांनी मूर्तीबाबत प्रशासन व पुरातत्व विभागाला कळवले होते. यानंतर पुरातत्व विभागाने घटनास्थळी पोहोचून उत्खनन करून घेतले. त्यानंतर ही मूर्ती स्थानिक मंदिराच्या संग्रहालयात ठेवण्यात आली. An ancient Nandi idol found at Udaipur near Vidisha in Madhya Pradesh; Further excavations are likely to reveal a larger temple

    गंजबासोडा तहसीलपासून 16 किलोमीटर अंतरावर असलेले उदयपूर गाव खूप प्राचीन मानले जाते. 10व्या-11व्या शतकात राजा उदय आदित्यच्या कारकिर्दीत हे गाव एक प्रमुख धार्मिक केंद्र असल्याचे सांगितले जाते. हे गाव प्राचीन नीलकंठेश्वर शिव मंदिर आणि नटराजाच्या सर्वात मोठ्या मूर्तीसाठी ओळखले जाते.

    दैनिक भास्करच्या रिपोर्ट नुसार , गुरुवारी (09 मार्च 2023) विदिशा जिल्ह्यातील गंजबासोडा तहसील अंतर्गत येणाऱ्या उदयपूर गावात मुले क्रिकेट खेळत होती. दरम्यान, एका मुलाने मूर्तीचा वरचा भाग पाहिला. मुलांनी स्थानिक ग्रामस्थांना मूर्तीची माहिती दिली. यावर गावकऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून माती काढली असता त्यांना ही मूर्ती नंदीची असल्याचे समजले.

    यानंतर, ग्रामस्थांनी प्रशासन आणि पुरातत्व विभाग आणि इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज म्हणजेच INTACH च्या अधिकाऱ्यांना मूर्ती सापडल्याची माहिती दिली. माहितीच्या आधारे पुरातत्व विभागाचे पथक शुक्रवारी (10 मार्च 2023) घटनास्थळी पोहोचले. जिथे खोदकाम करून मूर्ती काढण्यात आला. त्यानंतर साफसफाई करून नंदीची ही प्राचीन मूर्ती स्थानिक पिसनहरी मंदिराच्या संग्रहालयात सुरक्षित ठेवण्यात आली.याच उत्खननाच्या वेळी प्राचीन काळातील दिवे व भांडी यांचे अवशेषही सापडले आहेत. हे अवशेषही तपासासाठी सुरक्षित ठेवण्यात आले होते.

    मूर्ती मिळण्याबाबत जिल्हा पुरातत्व अधिकारी नम्रता यादव सांगतात की, माहिती मिळताच पुरातत्व विभागाचे पथक घटनास्थळी गेले. मूर्ती बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आली आहे. ही मूर्ती अतिशय प्राचीन आणि सुंदर आहे.

    या नंदीच्या मूर्ती भोवती प्राचीन मंदिर असावे.अशी शक्यता उदयपूर गावातील ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. अशा स्थितीत आजूबाजूच्या परिसरात उत्खनन केले तर काही प्राचीन मंदिर किंवा त्याचे अवशेष खाली सापडण्याची शक्यता आहे.

    An ancient Nandi idol found at Udaipur near Vidisha in Madhya Pradesh; Further excavations are likely to reveal a larger temple

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य