विमानात २२० प्रवासी होते, जाणून घ्या नेमकं काय घडलं
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पॅरिसला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाने शुक्रवारी दुपारी उड्डाण २२० प्रवाशांसह उड्डाण केले. मात्र त्या दरम्यान विमानतळावरील ग्राउंड फोर्सला धावपट्टीवर संशयास्पद टायरचा ढिगारा आढळून आल्याने विमानतळावर एकच खळबळ उडाली. यानंतर तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवण्यात आले आणि विमान परत बोलावण्यात आले. An Air India flight from Delhi to Paris had a tire burst during the flight Takeoff
पॅरिसला जाणारे एअर इंडियाचे विमानाला शुक्रवारी धावपट्टीवर संशयास्पद टायरचा ढिगारा दिसल्याने उड्डाणानंतर लगेचच IGI विमानतळावर परतावे लागले, असे IGI विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले. दिल्ली एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) ने दुपारी 1.22 वाजता उड्डाण केल्यानंतर लगेचच फ्लाइट क्रूला परिस्थितीची माहिती दिली.
एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले की, “दिल्ली-पॅरिस विमान AI143 28 जुलै 2023 रोजी उड्डाणानंतर लगेचच परत आले. दिल्ली ATC ने उड्डाणानंतर धावपट्टीवर संशयास्पद टायरच्या ढिगाऱ्यांबद्दल क्रूला माहिती दिली आणि दुपारी 2.18 वाजता उड्डाण सुरक्षितपणे दिल्लीला परतले. दिल्लीतील आवश्यक तपासण्या बाकी असताना प्रवाशांना त्यांच्या इच्छितस्थळी नेण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत, पण नेहमीप्रमाणेच प्रवाशांची सुरक्षितता राखली जाईल. हेच एअर इंडियाचे सर्वोच्च प्राधान्य आहे.
An Air India flight from Delhi to Paris had a tire burst during the flight Takeoff
महत्वाच्या बातम्या
- कटिहार गोळीबार प्रकरणी गिरीराज सिंह यांचे नितीश कुमार सरकारवर टीकास्त्र, म्हणाले ‘धृतराष्ट्र बनले आहेत…’
- द्रष्टे उद्योगपती रतन टाटा यांना महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार जाहीर; राज्य सरकारची घोषणा
- राष्ट्रवादीत कोण कुणाकडे?? : झाकली मूठ फक्त 54 आमदारांची; पण स्वप्नं मात्र मुख्यमंत्री पदाची!!
- भारतीय तटरक्षक दलाने समुद्रात अडकलेल्या ‘सिंधू साधना’ संशोधन जहाजातून आठ शास्त्रज्ञांसह ३६ जणांची केली सुटका!