प्रतिनिधी
मुंबई : “कलाकाराला कलेद्वारेच आदरांजली वाहिली जाऊ शकते” हे ब्रीदवाक्य कायम ठेवत. डेअरी ब्रँड अमुल मोनोक्रोम डूडल द्वारे कलाकारांना आदरांजली वाहत असते. डूडल द्वारे ज्येष्ठ अभिनेत्यांचा सन्मान देखील करत असते. Amul’s unique tribute to Satish Kaushik saying Aap Hamare Dil Me Rahte Hai!!
अभिनेता, दिग्दर्शक, विनोदी अभिनेता आणि निर्माता सतीश कौशिकी यांचे गुरुवारी 9 मार्च रोजी निधन झाले. अमूलने एक डूडल शेअर करत अभिनेता सतीशजींना श्रद्धांजली वाहिली. ज्यामध्ये त्यांनी वर्षानुवर्ष पडद्यावर साकारलेली विविध पात्रांची ॲनिमेटेड कॅरेक्टर्स दिसत आहेत. “जाने भी दो यार” “मिस्टर इंडिया” आणि “बडे मिया” या आयकॉनिक चित्रपटांमधील त्यांच्या पात्रांची अमूलने डूडल तयार केले आहे.
त्यांचा 1999 चा चित्रपटाचा ‘हम आपके दिल मे रहते’ है ह्याच याच चित्रपटाचे शीर्षक फिरवत एक चाहता म्हणून “आप हमारे दिल मे रहते है” असे अमूलने डूडलवर लिहिले आहे. या मधुर शब्दांनी या ज्येष्ठ कलाकाराला आपल्या कलेद्वारे अमूलने आदरांजली राहिली आहे.
1987 चा सुपरहिट चित्रपट मिस्टर इंडिया मधील कॅलेंडर तर दिवाना मस्ताना (1997) मधील पप्पू पेजर आणि सारा दिग्दर्शित ब्रिक लेन (2007) मधील चानू भूमिकेतून सतीश कौशिक यांनी आपल्याला मनावर राज केले.
Amul’s unique tribute to Satish Kaushik saying Aap Hamare Dil Me Rahte Hai!!
महत्वाच्या बातम्या
- स्वयंघोषित काँग्रेस युवराजाने सर्व मर्यादा ओलांडल्या!, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी घेतला राहुल गांधींचा समाचार
- ओवैसींना बी टीम म्हणून हिणवताना पवारच बनलेत का भाजपची बी टीम??
- रामचंद्र पौडेल नेपाळचे नवे राष्ट्रपती; १७ वेळा पंतप्रधानपदाच्या निवडणुकीत झाले आहेत पराभूत
- उद्धव ठाकरे यांना बजेटवर बोलायला लावून अजितदादांनी कुणाला मारला डोळा??