• Download App
    तेरा साया साथ होगा : अटर्ली बटर्ली डिलिशियस अमूलची लतादीदींना अनोखी श्रद्धांजली!! amul tribute to lata mangeshkar

    तेरा साया साथ होगा : अटर्ली बटर्ली डिलिशियस अमूलची लतादीदींना अनोखी श्रद्धांजली!!

    प्रतिनिधी

    मुंबई : “तेरा साया साथ होगा” या लतादीदींच्या प्रसिद्ध गीताचा आधार घेत अटर्ली बटर्ली डिलिशियस अमूलने लतादीदींना अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे. लतादीदींचे अमूल गर्लच्या रूपातली अर्कचित्रे सादर करून अमूलने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर ही श्रद्धांजली अर्पण केली आहे. amul tribute to lata mangeshkar

    देशातल्या ताज्या घडामोडींवर अर्कचित्रे सादर करून आपली अनोखी जाहिरात करण्याची अमूलची फार पूर्वी पासूनची पद्धत आहे. जेव्हा देशात मोठ्या घडामोडी घडतात अथवा महान व्यक्तींचे निधन होते तेव्हा अमूल त्यांच्या अमूल बॉय आणि अमूल गर्ल या रूपातली अर्कचित्रे सादर करून या घडामोडींचा परामर्श घेत असतात अथवा महान व्यक्तींना श्रद्धांजली वाहत असतात.


    Lata Mangeshkar : कोल्हापुरातील याच घरात गेलं लतादीदींचं बालपण, मंगेशकर कुटुंबीय १० वर्षे राहिले


    हीच परंपरा लतादीदींच्या निधनानंतर अमूलने पुढे नेली आहे. लतादीदी तंबोऱ्यावर रियाज करताना आणि लतादीदी स्टेजवर गाणे गाताना अशी त्यांची अमूल गर्लचा रूपातली अर्कचित्रे सादर करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

    amul tribute to lata mangeshkar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    अलंद मतदारसंघातील मतदार वगळल्याचा राहुल गांधी यांचा दावा दाव्यावर निवडणूक आयोगाने फेटाळला

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले – पराली जाळणाऱ्यांना अटक का नाही, दंड अपुरा, शेतकऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज

    Nirmala Sitharaman : GST सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेत 2 लाख कोटी येतील; अर्थमंत्री म्हणाल्या- दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होतील, सामान्य लोकांकडे जास्त पैसे शिल्लक राहतील