विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : operation sindoor चा मुकाबला करताना पाकिस्तानी लष्कराने किती आणि कोणते विषारी कारस्थान रचले होते आणि ते भारतीय सैन्याने कसे उधळून लावले, यांचे एकापाठोपाठ एक धक्कादायक खुलासे समोर आलेत.
एकीकडे खलिस्तानी दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानने शिखांचे पवित्र सुवर्ण मंदिर उडवायचे होते. पाकिस्तानी लष्कराने सुवर्ण मंदिराच्या दिशेने ड्रोन आणि मिसाईल हल्ले केले होते. पण भारतीय सैन्य दलाच्या एअर डिफेन्स सिस्टीमने ते सगळे हल्ले नाकाम केले, अशी माहिती जनरल कमाडिंग ऑफिसर मेजर जनरल कार्तिक शेषाद्री यांनी दिली.
Operation sindoor मध्ये पाकिस्तानातले मोठे दहशतवादी अड्डे नष्ट करायचे टार्गेट भारतीय सैन्य दलाने ठेवले होते. त्यामुळे 9 शहरांमध्ये हल्ले करून भारताने ते काम तमाम केले, पण भारतीय हल्ल्यांना उत्तर देताना पाकिस्तानी लष्कराकडे कुठले निश्चित टार्गेटच नव्हते. त्यामुळे ते भारतीय नागरी वस्त्यांवर आणि धार्मिक केंद्रांवर हल्ले करणार हे आम्हाला माहिती होते म्हणून आम्ही सर्व धार्मिक केंद्रांवर आणि संवेदनशील नागरिक वस्त्यांवर एअर डिफेन्स सिस्टीम मजबूत करून ठेवली होती.
9 मे रोजी पाकिस्तानने रात्री आणि पहाटेच्या अंधाराचा फायदा उपटून सुवर्ण मंदिराच्या दिशेने ड्रोन आणि मिसाईल्सचा मारा केला. त्यांना सुवर्ण मंदिर उडवून भारताबरोबर सगळ्या जगात खळबळ माजवून द्यायची होती. पण भारतीय सैन्याच्या एअर डिफेन्स सिस्टीमने पाकिस्तानचे सगळे ड्रोन आणि मिसाईल हल्ले नाकाम केले. त्यामुळे पाकिस्तान सुवर्ण मंदिराला धक्का लावू शकला नाही, असे मेजर जनरल कार्तिक शेषाद्री यांनी स्पष्ट केले.
यावेळी भारतीय सैन्याने एअर डिफेन्स सिस्टीम कशा पद्धतीने कार्यरत होती आणि आहे याचे प्रात्यक्षिक देखील दाखविले.