अमृतसरच्या सुवर्ण मंदिर परिसरात एका तरुणाला जमावाने बेदम मारहाण करत त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.Amritsar Golden Temple youth death: Defamation of Guru Granth Sahib by youth in Golden Temple; Young man killed in beating of devotees
विशेष प्रतिनिधी
अमृतसर: पंजाबमधील अमृतसर सुवर्ण मंदिरात एका अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. येथे पवित्र गुरु ग्रंथ साहिबसोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाची कथित हत्या (लिंचिंग) करण्यात आली आहे. डीसीपी परमिंदर सिंग यांनी या व्यक्तीच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. या घटनेनंतर सुवर्ण मंदिरातील वातावरण प्रचंड तापले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेहरास साहिब पठणादरम्यान (Rehraas Sahib Paath) एका अज्ञात व्यक्तीने सुवर्ण मंदिराच्या आत रेलिंगवरून उडी मारली आणि कथितपणे गुरु ग्रंथ साहिबसमोर ठेवलेली तलवार हिसकावण्याचा प्रयत्न केला. यामुळे येथे जमावाने चिडून तरुणाला बेदम मारहाण केली. ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
एसजीपीसीचे कार्यकारिणी सदस्य भाई गुरप्रीत सिंग रंधावा यांनी सोशल मीडियावर सांगितले की, ‘श्री अमृतसर साहिबमधील दुर्दैवी घटनेचा निषेध करतो, पंजाब सरकारने त्वरित याची चौकशी करावी.’
या घटनेची पुष्टी करताना अमृतसरचे डीसीपी परमिंदर सिंह म्हणाले, ‘मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी नेण्यात आला आहे. जेव्हा घटना घडली त्यावेळी तो एकटाच होता असे दिसते. या प्रकरणाची चौकशी सध्या सुरू आहे.’
असे सांगितले जात आहे की, तरुणाने अचानक ग्रीलवरून उडी मारली आणि साहिबजींपर्यंत पोहोचला. मुख्य इमारतीत फक्त ग्रंथींनाच बसण्याची परवानगी आहे. दरबार साहिबच्या या ठिकाणी, पवित्र श्री गुरु ग्रंथ साहिबचा प्रकाश आहे. पंजाबचे गृहमंत्री सुखजिंदर सिंह रंधावा यांनीही हरिमंदिर साहिब गुरुद्वारामध्ये कथितपणे घुसलेल्या व्यक्तीच्या मृत्यूची पुष्टी केली.
भाजप नेते मनजिंदर सिंह सिरसा यांनी याप्रकरणी कट असल्याचा आरोप केला आहे. या घटनेबाबत आपण गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बोललो असल्याचेही त्यांनी सांगितले.याप्रकरणी आपल्याला त्यांनी चौकशीचे आश्वासन दिले आहे.
Amritsar Golden Temple youth death: Defamation of Guru Granth Sahib by youth in Golden Temple; Young man killed in beating of devotees
महत्त्वाच्या बातम्या
- मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयामुळेच सहकार अडचणीतून बाहेर, देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना उत्तर
- योगी आदित्यनाथांचे सरकार येण्यापूर्वी पश्चिम यूपीमध्ये लोक रस्त्यावर बंदुकीचे कट्टे ओवाळायचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका
- पत्रकार निधी रझदान, रोहिणी सिंग यांच्यापेक्षा भाजपा प्रवक्तया निघत अब्बास हुशार, हॉवर्ड विद्यापीठाचा बनावटगिरी ओळखून केली तक्रार
- चीनसोबतचा तिढा कायम, पूर्व लडाखमध्ये हवाई दलाची तैनाती सुरूच, हवाई दल प्रमुखांची माहिती