• Download App
    अमृतपाल सिंगने खडूर साहिब मतदारसंघाचे खासदार म्हणून घेतली शपथ!|Amritpal Singh took oath as MP of Khadoor Sahib constituency

    अमृतपाल सिंगने खडूर साहिब मतदारसंघाचे खासदार म्हणून घेतली शपथ!

    दिब्रुगड तुरुंगातून कडेकोट बंदोबस्तात नवी दिल्लीत आणले गेले.


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कट्टरपंथी शीख धर्मोपदेशक अमृतपाल सिंग हे आता खडूर साहिबचे खासदार आहेत. तुरुंगात असलेल्या अमृतपालला आज खासदार म्हणून शपथ घेण्यासाठी पॅरोल मंजूर करण्यात आला आहे.Amritpal Singh took oath as MP of Khadoor Sahib constituency

    खलिस्तानी समर्थक अमृतपाल यांनी नवी दिल्लीत खासदारपदाची शपथ घेतली आहे. खडूर साहिब मतदारसंघाच्या खासदाराला आसाममधील दिब्रुगड तुरुंगातून सुरक्षेत नवी दिल्लीत आणण्यात आले. अमृतपाल यांनी सभापती ओम बिर्ला यांच्यासमोर लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेतली.



    अमृतपालचे वडील तरसेम सिंग यांचेही वक्तव्य समोर आले आहे. ते म्हणाले की, खडूर साहिबच्या मतदारांसाठी आणि जगभरात राहणाऱ्या पंजाबींसाठी ही आनंदाची बाब आहे. ते खासदार होतील की नाही, अशी चर्चा होती, मात्र आज याला पूर्णविराम दिला जाणार आहे.

    पंजाब दे वारिसचे प्रमुख अमृतपाल सिंग यांना विमानाने आसामहून दिल्लीत आणण्यात आले. पॅरोल कालावधीत अमृतपालवर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. कोणतेही विधान करण्यास मनाई आहे. या कालावधीत अमृतपाल त्याच्या कुटुंबीयांना भेटू शकतो, परंतु कोणत्याही प्रकारचे व्हिडिओ बनवण्यास किंवा छायाचित्रे काढण्यास बंदी आहे. खासदार अमृतपाल सिंग यांना ५ जून ते ९ जूनपर्यंत पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. या काळात ते खडूर साहिबला जाऊ शकत नाहीत. खासदाराला दिल्लीतच राहावे लागेल. लोकसभा सचिवांनीच त्यांचे राहण्याचे ठिकाण ठरवले आहे.

    Amritpal Singh took oath as MP of Khadoor Sahib constituency

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    कर्नाटकच्या काँग्रेस सरकारची “कमाल”; 613 कोटींच्या भाड्याच्या यांत्रिक झाडूंनी बंगलोरचे रस्ते झाडणार!!

    Mehbooba Mufti : मेहबूबा म्हणाल्या- लाल किल्ल्यासमोर काश्मिरी समस्यांचे पडसाद; सरकारचे जम्मू-काश्मीर सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन, पण दिल्लीच धोक्यात

    India US : टॅरिफनंतर भारत-अमेरिका यांच्यात पहिला करार; भारत आपल्या गरजेच्या 10% गॅस अमेरिकेकडून खरेदी करणार