महाराष्ट्रातील ४४ रेल्वेस्थानकांचा समावेश, जाणून घ्या कोणती रेल्वेस्थानकं आहेत?
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार, 6) ऑगस्ट रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अमृत भारत स्टेशन योजना सुरू केली. ज्याअंतर्गत देशभरातील 1309 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाच्या पायाभरणीचा समावेश करण्यात आला आहे. ही सर्व 508 रेल्वे स्थानके 27 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पसरलेली आहेत. त्यापैकी 490 रेल्वे स्थानके राज्यांची आणि 18 केंद्रशासित प्रदेशांची आहेत. Amrit Bharat Station Scheme launched by Prime Minister Modi
या कार्यक्रमाला संबोधित करताना मोदी म्हणाले की, ‘’अमृतकालच्या सुरुवातीला या ऐतिहासिक कामासाठी मी रेल्वे मंत्रालयाचे कौतुक करतो. यासोबतच मी सर्व देशवासियांचे अभिनंदन करतो. आज संपूर्ण जगाच्या नजरा भारताकडे लागल्या आहेत. जागतिक स्तरावर भारताची विश्वासार्हता वाढली आहे. भारताकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलला आहे. याची दोन मुख्य कारणे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे भारतातील जनतेने तीन दशकांनंतर पूर्ण बहुमताने सरकार स्थापन केले आहे. पूर्ण बहुमत असलेल्या सरकारने स्पष्टतेने मोठे निर्णय घेतले आहेत. देशात 30 वर्षांत पहिल्यांदाच असे घडले आहे. या देशातील पूर्ण बहुमताच्या सरकारने जगात भारताचा गौरव वाढवण्याचे काम केले आहे.’’
अमृत भारत स्थानक योजनेच्या ऐतिहासिक उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील एकूण 44 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होणार आहे.
महाराष्ट्रातील 44 स्थानके पुढील प्रमाणे –
अहमदनगर, कोपरगाव, बडनेरा, धामणगाव, परळी वैजनाथ, शेगाव, मलकापूर, बल्हारशाह, चंद्रपूर, चंदा फोर्ट, वडसा, गोंदिया, हिंगोली डेक्कन, चाळीसगाव, जालना, परतूर, लातूर, परेल, कांजूर मार्ग, विक्रोळी, नरखेड जंक्शन, गोधनी, काटोल, छत्रपती संभाजीनगर, मुदखेड जंक्शन, किनवट,मनमाड जंक्शन, नगरसोल, धाराशीव, परभणी जंक्शन, गंगाखेड, पूर्णा जंक्शन, सेलू, कोल्हापूर, दौंड, तळेगांव, आकुर्डी, सोलापूर, पंढरपूर, कुर्डूवाडी जंक्शन, हिंगणघाट, सेवाग्राम, पुलगाव जंक्शन, वाशिम
Amrit Bharat Station Scheme launched by Prime Minister Modi
महत्वाच्या बातम्या
- ‘चांद्रयान-3’ बद्दल GOOD NEWS! चंद्राच्या कक्षेत पोहोचले, ‘इस्रो’ने दिली माहिती
- नेमाडेंची मुक्ताफळे; औरंगजेबाच्या दोन राण्या काशीच्या पंड्यांनी केल्या भ्रष्ट; शिवाजी महाराजांचा मुख्य सरदार मुसलमान, तर औरंगजेबाचा हिंदू!!
- Earthquake: दिल्ली-एनसीआर मध्ये ५.८ रिश्टर स्केलचा भूकंप, लोक घाबरून पळाले घराबाहेर
- तामिळनाडू : मंत्री व्ही.सेंथील बालाजी यांच्या निकटवर्तीयाच्या घरावर ‘ED’चा छापा!