• Download App
    जगातील १४ देशांमध्ये ओमिक्रॉन विषाणूचा शिरकाव, भारतातसध्या एकही रुग्ण नाही । Amricon enters in almost 15 countries in the world

    जगातील १४ देशांमध्ये ओमिक्रॉन विषाणूचा शिरकाव, भारतातसध्या एकही रुग्ण नाही

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : भारतामध्ये कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ या व्हेरिएंटचा अद्यापपर्यंत एकही रुग्ण आढळून आलेला नाही. हा विषाणू देशामध्ये प्रवेश करू नये म्हणून उपाययोजना आखण्यात येत आहेत.’’ अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी दिली. Amricon enters in almost 15 countries in the world

    मंडाविया म्हणाले, की ‘‘ आतापर्यंत जगातील १४ देशांमध्ये हा विषाणू आढळून आला आहे. आपल्या देशामध्येही बारकाईने पडताळणी सुरू असून अद्यापपर्यंत तो येथे सापडलेला नाही. मागील संकटातून आपण खूप काही शिकलो असून सध्या आपल्याकडे मुबलक प्रमाणात स्रोत आणि प्रयोगशाळा देखील उपलब्ध आहेत.’’



    सध्या देशातील स्थिती नियंत्रणात असली तरीसुद्धा येथील संसर्ग अद्याप संपलेला नसल्याने लोकांनी नियम पाळणे गरजेचे आहे. सध्या घरोघरी जाऊन लोकांना लस दिली जात असून रोज ७० ते ८० लाख लोकांचे लसीकरण केले जात आहे. आतापर्यंत १२४ कोटी लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

    Amricon enters in almost 15 countries in the world

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Kangana Ranaut : कंगना रणौतवर देशद्रोहाचा खटला चालणार; शेतकरी आंदोलनात रेप-हत्या झाल्याचे म्हटले होते; सुनावणी आग्रा न्यायालयात

    Delhi Blast : दिल्ली स्फोट: 200 शक्तिशाली IED बनवण्याची होती तयारी; एकत्र अनेक स्फोटांनी नरसंहाराचा होता कट

    New York Mumbai : अमेरिकन अब्जाधीश म्हणाले- न्यूयॉर्क मुंबईसारखे होईल, ममदानींच्या विजयावर चिंता व्यक्त