• Download App
    सुप्रियांची कारकीर्द सुरू झाली नव्हती म्हणून तुमच्याकडे मुख्यमंत्री पदाचा उमेदवार नव्हता, हे सांगा ना!!; मिटकरींचा पवारांना टोला Amol mitkari targets sharad pawar over chief ministerial candidate issue

    सुप्रियांची कारकीर्द सुरू झाली नव्हती म्हणून तुमच्याकडे मुख्यमंत्री पदाचा उमेदवार नव्हता, हे सांगा ना!!; मिटकरींचा पवारांना टोला

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राष्ट्रवादीकडे आर. आर. पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, अजित पवार यांच्यासारखे नेते होते. परंतु, तरीदेखील सुप्रिया सुळे यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली नव्हती म्हणून राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार नव्हता हे शरद पवारांनी महाराष्ट्राला खरं सांगावं, अशा परखड शब्दांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी शरद पवारांना टोला हाणला.

    2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता, असे वक्तव्य शरद पवारांनी लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत केले त्यावर महाराष्ट्रामध्ये प्रतिक्रियांचे तरंग उमटले.



    अमोल मिटकरी म्हणाले :

    राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करायचे नव्हता की तुमच्याकडे खरंच उमेदवार नव्हता. आर. आर. पाटील, विजयसिंह मोहिते पाटिल, अजितदादा हे नेते तेव्हा होतेच. पण या पैकी कोणालाच मुख्यमंत्री करायचं नव्हतं, हे सत्य पवारांनी महाराष्ट्राला सांगावं. सरकार पाडेपर्यंत भूमिका कुणी घेतल्या?? पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री म्हणून लादले. उद्धव ठाकरे यांना अनुभव नसताना मुख्यमंत्री केलं. हे सगळं पवारांनीच केलं ना!!

    मग सुप्रिया सुळेंची राजकीय कारकीर्द तेव्हा सुरु झाली नव्हती म्हणून 2004 मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार नव्हता, असं देखील पवारांनी सांगावे असा यांनी हाणला.

    Amol mitkari targets sharad pawar over chief ministerial candidate issue

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Rajpal Yadav : राजपाल यादव म्हणाला- माझ्याकडे ₹1200 कोटींचे काम आहे, तरीही प्रकरण तुरुंगापर्यंत पोहोचले, तक्रारदाराने मालमत्तेची कागदपत्रे आणि सुरक्षा रक्कम नाकारली

    West Bengal : बंगाल SIR- अंतिम यादीत 7.04 कोटींहून अधिक मतदार; 61 लाख लोकांची नावे वगळली

    Andhra Pradesh : आंध्र प्रदेशातील फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट; 21 लोकांचा मृत्यू, 8 गंभीर जखमी; 5 किमीपर्यंत ऐकू आला स्फोटाचा आवाज