• Download App
    अमिताभ बच्चन यांचे टीकाकारांना चोख उत्तर, म्हणाले ही मदत केली पण मदतीबाबत चर्चा करणे लाजीरवाणे|Amitabh Bachchan's critical response to the critics, he said helped but embarrassed to discuss help

    अमिताभ यांचे टीकाकारांना चोख उत्तर..म्हणाले, ‘ही’ मदत केली! मदतीबाबत बोलणे लाजीरवाणे; पण नाईलाज आहे!

    कोरोनाकाळात अनेकांकडून मदत करण्यात येत आहे. बॉलीवुडच्या कलाकारांकडूनही मोठ्या प्रमाणावर मदत करण्यात येत आहे. यामध्ये बिग बी म्हणजे अमिताभ बच्चन यांनी काय मदत केली असे विचारले जाते. आपल्या या टीकाकारांना त्यांनी चोख उत्तर दिले असून मदतीबाबत चर्चा करणे लाजीरवाणे असल्याचे म्हटले आहे.Amitabh Bachchan’s critical response to the critics, he said helped but embarrassed to discuss help


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : कोरोनाकाळात अनेकांकडून मदत करण्यात येत आहे. बॉलीवुडच्या कलाकारांकडूनही मोठ्या प्रमाणावर मदत करण्यात येत आहे. यामध्ये बिग बी म्हणजे अमिताभ बच्चन यांनी काय मदत केली असे विचारले जाते.

    आपल्या या टीकाकारांना त्यांनी चोख उत्तर दिले असून मदतीबाबत चर्चा करणे लाजीरवाणे असल्याचे म्हटले आहे.अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे की,



    त्यांनी केलेल्या मदतीबद्ल सोशल मीडियावर चर्चा करणे त्यांना लाजिरवाणे वाटते. त्यांच्यासोबत होणारे गैरवर्तन आणि कमेंट करत केल्या जाणाऱ्या टीका या सगळ्या गोष्टी त्यांचे कुटुंब हे अनंत काळापासून सहन करत आहेत

    अमिताभ यांनी लिहिले आहे की, त्यांनी दिल्लीत असलेल्या कोरोना फॅसिलीटीसाठी २ कोटींचे योगदान केले आहे. माझ्या वैयक्तिक फंडाद्वारे सुमारे १५०० शेतकºयांच्या बँकेतील कर्जाची भरपाई केली आणि त्यांना आत्महत्या करण्यापासून थांबवले. गेल्या वर्षी, त्यांनी एक महिन्यासाठी संपूर्ण देशात ४ लाख कामगारांना जेवण दिले. एका शहरातील सुमारे ५ हजार लोकांना त्यांनी दुपारचे आणि रात्रीचे जेवण दिले. मास्क, फ्रंटलाइन वर्कर्सला पीपीई किट दिल्या, पोलिसांच्या रुग्णालयात हजारोंमध्ये पर्सनल फंड्स दिले.

    स्थलांतरीत मजुरांना केलेल्या मदतीबाबत अमिताभ यांनी लिहिले आहे की, उत्तर प्रदेश आणि बिहारमधील कामगारांना परतण्यासाठी ३० बस बूक केल्या आणि त्यांच्या रात्रीच्या प्रवासासाठी जेवणाचा आणि पाण्याचा पुरवठा केला.

    या सोबत ज्यांच्याकडे चप्पल नव्हत्या त्यांना चप्पल देखील दिल्या. मुंबई ते उत्तरप्रदेश अशी एक संपूर्ण ट्रेन बूक केली, ज्या ट्रेनमध्ये २८०० प्रवासी मोफत गेले. त्यासाठी मी पैसे दिले होते. जेव्हा त्या राज्यांनी त्या लोकांना राज्यात येण्यावर बंदी केली, तेव्हा तातडीने ३ चार्टड इंडिगो एअरलाईन विमानाने प्रत्येकी १८० प्रवास्यांना उत्तर प्रेदश, बिहार, राजस्थान आणि जम्मू-काश्मिरला पोहोचवले. बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी २० व्हेंटिलेटरची व्यवस्था केलीअसून ते सर्व व्हेंटिलेटर श्री रकाबगंज साहिब गुरुद्वारामध्ये उभारलेल्या सुविधेसाठी देणगी म्हणून दिले. संपूर्ण डायग्नोस्टिक सेंटर दान केले आहे जे दिल्ली शीख गुरुद्वारा मॅनेजमेंट कमिटीमार्फत दिल्लीच्या श्री बंगला साहिब गुरुद्वारा येथे उघडल. ज्यांनी करोनामध्ये त्यांचे आई-वडील गमावले अशा दोन मुलांना त्यांनी दत्तक घेतले असून त्यांच्या शिक्षणाचा १० वी पर्यंतचा खर्च ते पुरवणार आहेत.

    Amitabh Bachchan’s critical response to the critics, he said helped but embarrassed to discuss help

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य