Amitabh bachchan – बड्या सेलिब्रिटी त्यांच्या सामाजिक कामाच्या माध्यमातून अनेकदा चर्चेत राहत असतात. सध्याच्या कोरोना काळातही अनेक सेलिब्रिटी गरीब, गरजुंसाठी काय-काय करत आहेत, हे अनेकदा माध्यमे किंवा सोशल मीडियावर येत असतं. पण काही सेलिब्रिटी असेही असतात जे अशा गोष्टींची चर्चा करण्याऐवजी केवळ काम करत राहतात. त्याची प्रसिद्धी करत नाही. असेच सेलिब्रिटी म्हणजे बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन. बिग बी हे अनेकदा सामाजिक कार्य करत असतात. पण त्याची प्रसिद्धी करत नाहीत. पण ट्रोलर्सकडून कायम त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर होणाऱ्या टीकेला कंटाळून नुकतीच त्यांनी केलेल्या कामांची यादीच जाहीर केली. केलेल्या मदतीबद्ल सोशल मीडियावर चर्चा करणे लाजिरवाणे आहे. पण मदतीवरून केल्या जाणाऱ्या घाणेरड्या कमेंट्स माझे कुटुंब अनंत काळापासून सहन करत आहेत. म्हणून नाईलाजास्तव हे सांगावे लागत आहे, असं म्हणत बच्चन यांनी ही यादी दिली. Amitabh bachchan declared list of social work done by him
हेही वाचा –
- WATCH : घागर घेऊन फेम.. कार्तिकीने पतीसह जालन्यात घेतली कोरोनाची लस
- WATCH : मुंबई मनपावर दरेकरांचा हल्लाबोल, कौतुकाचे सोहळे थांबवा आणि यंत्रणा सक्षम करा
- WATCH : हा Video घाबरवण्यासाठी नाही तर तुमचे गांभीर्य वाढवण्यासाठी आहे, नक्की पाहा
- WATCH : कोरोनाशी झुंज देणाऱ्या रुग्णांसाठी भाजप खासदारांचा पुढाकार, सोनू निगमने केलं कौतुक
- WATCH : काम करत नसतील तर काढून टाका, रुग्णालयातील अस्वच्छतेने सत्तारांचा संताप