रणदीप हुड्डाही मंचावर उपस्थित, पाहा व्हिडिओ
विशेष प्रतिनिधी
मुंबई : अमिताभ बच्चन यांना ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे. मुंबईतील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात अमिताभ बच्चन यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अमिताभ बच्चन यांच्यासोबत रणदीप हुड्डासह अनेक दिग्गज मंडळी याप्रसंगी मंचावर उपस्थित होती. Amitabh Bachchan awarded Lata Dinanath Mangeshkar Award
या सन्मानासाठी निवड झाल्याबद्दल अमिताभ बच्चन यांनी लोकांचे आभार मानले आहेत. तसेच, या खास प्रसंगी अमिताभ बच्चन यांनी भारतरत्न लता मंगेशकर यांच्यासोबतचा एक प्रसंगही शेअर केला आहे.
अमिताभ बच्चन यांनी सांगितले की, एकदा मी माझ्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी न्यूयॉर्कमध्ये होतो. येथे मी मंचावर लताजींना भेटलो. जेव्हा मी न्यूयॉर्कमध्ये होतो, तेव्हा कोणीतरी मला सांगितले की लताजी देखील येथे आहेत आणि त्यांना भेटायचे आहे. त्यांनी मला मॅडिसन स्क्वेअरमध्ये एक शो असल्याचे सांगितले. त्याने मला त्यांच्यासमोर जाऊन स्टेज सेट करण्यास सांगितले. मी त्याची विनंती मान्य केली. त्या म्हणाल्या की मला माहीत आहे की, तुम्ही तुमच्या चित्रपटात गाणीही गायली आहेत. माझी इच्छा आहे की स्टेजवर तुम्ही ‘ मेरे अंगने में’ हे गाणे लोकांसाठी गायचे आहे. यानंतर मी स्टेजवर गेलो आणि लताजींसमोर गाणे गायले आणि स्टेज सेट केला.
Amitabh Bachchan awarded Lata Dinanath Mangeshkar Award
महत्वाच्या बातम्या
- केरळच्या डाव्या आमदाराची राहुल गांधींवर टीका, DNA टेस्ट करून घ्या; गांधी आडनाव लावण्याचा अधिकार नाही!
- माढात पुन्हा ताटातलं वाटीत, वाटीतलं ताटात; फलटणमध्ये रामराजे माईक निंबाळकर यांचे यांचे कुटुंब मोहिते पाटलांच्या गोटात!!
- नूडल्सच्या पॅकेटमध्ये हिरे अन् अंडरगारमेंटमध्ये आढळले सोने!
- काँग्रेसचे परराष्ट्र धोरणही व्होट बँक पॉलिटिक्स आणि तुष्टीकरणाचे; जयशंकरांनी उदाहरणांसकट काढले वाभाडे!!