विशेष प्रतिनिधी
पुद्दुचेरी : देशाची संस्कृती ही विविध प्रांतांना एकत्रित बांधून ठेवते. त्यामुळेच भारत संस्कृतीच्या धाग्याने बांधलेला भू-सांस्कृतिक देश असून, त्यातून सर्व समस्यांचे आपोआप निराकरण होते, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले.Amit Shah’s statement that India is a geo-cultural country built on the thread of culture
श्री ऑरोबिंदो यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. शाह म्हणाले, देश समजून घेण्यासाठी प्रत्येकाने आॅरोबिंदो यांचे साहित्य वाचले, ऐकले पाहिजे, त्यांचे योगदान जाणून घेतले पाहिजे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि द्वारकेपासून बंगालपर्यंत अशी एक संस्कृती असून ती देशाला बांधून ठेवत आहे.
देश याच धाग्याने बांधलेला राहण्याची गरज आहे. या देशात एकसूत्र कोणते असेल तर ते येथील संस्कृतीच आहे. देशाच्या कणकणात संस्कृती आहे. हीच बाब ऑरोबिंदो यांचे साहित्य वाचले की लक्षात येते.पुद्दुचेरीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा’, अशी मागणी मुख्यमंत्री एन. रंगसामी यांनी या वेळी केली.
अमित शहा यांनी येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन केले. या वेळी झालेल्या कार्यक्रमामध्ये रंगासामी यांनी राज्याच्या दजार्ची मागणी केली. ‘पुद्दुचेरीच्या विकासासाठी अधिक निधी उपलब्ध झाल्यास ती महत्त्वाची बाब ठरेल. केंद्र सरकारच्या सहकायार्मुळेच पुद्दुचेरी विकासमार्गावर चालत आहे, असे ते म्हणाले.
Amit Shah’s statement that India is a geo-cultural country built on the thread of culture
महत्त्वाच्या बातम्या
- नवनीत राणांशी तुरुंगात हीन वागणूक; राणांच्या पत्रानंतर लोकसभा सचिवालयाचे राज्य सरकारला निर्देश
- चंद्रकांत दादांनी उडवली भोंगे सर्वपक्षीय बैठकीची खिल्ली; नुसती चहा – बिस्किटे, निर्णय नाही!!
- पिस्टल विक्री करणाऱ्या आराेपींकडून ११ पिस्टल जप्त
- किरीट सोमय्यांवरील हल्लाप्रकरणी शिवसेनेचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वरांना अटक