प्रतिनिधी
कैराना : उत्तर प्रदेशातील ज्या शहरामधून 2017 पूर्वी हिंदूंना पलायन करणे भाग पडत होते त्या कैराना शहरामध्ये आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घरोघरी जाऊन भाजपचा प्रचार केला. आता कैराना मधून हिंदूंना पलायन करावे लागत नाही. हिंदू येथे परत आले आहेत त्यांना पाहून निश्चित आनंद होतो. केंद्र सरकार आणि राज्य सरकार त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेते, असे ट्विट अमित शहा यांनी केले आहे.Amit Shah’s house-to-house propaganda in the carana from which Hindus were fleeing
अमित शहा यांनी आज दिवसभर कैराना मध्ये घरोघर जाऊन भाजपचा प्रचार केला. त्यानंतर त्यांनी शहर आणि जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. अनेक बैठकांमध्ये ते सहभागी झाले. या वेळी तेथील हिंदू समाजाने अमित शहा यांचे भरघोस स्वागत केले आणि आपल्या अडचणी त्यांना निवेदन केल्या.
2017 नंतर भाजप सरकार उत्तर प्रदेशात स्थापन झाले. त्यानंतर कैराना मधून हिंदूंना पलायन करायला लावणारे गजाआड गेले. हिंदू आता कैराना मध्ये सुरक्षित आहेत. अनेक जण आपापल्या घरांमध्ये परत आले आहेत. अशा अनेक कुटुंबांच्या अमित शहा यांनी भेटी घेतल्या. तीन ठिकाणी त्यांच्या बैठकाही घेतल्या. कैराना मधील हिंदू आणि मुसलमान दोन्ही समाजांना अमित शहा यांनी सुरक्षिततेचे आश्वासन दिले. कैराना मधील प्रचाराचे फोटो अमित शहा यांनी आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केले आहेत.
Amit Shah’s house-to-house propaganda in the carana from which Hindus were fleeing
महत्त्वाच्या बातम्या
- वैद्यकीय अस्थायी सहाय्यक प्राध्यापकांचे झुणका-भाकर आंदोलन
- दिल्ली येथील आंतरराज्यीय सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेत महाराष्ट्राला प्रथम पारितोषिक
- प्रजासत्ताक दिनानिमित्त खादी सप्ताह गांधीभवन मैदानावर खादी प्रदर्शन, विक्री केंद्राचे उद्घाटन
- Assembly Elections : पाच राज्यांत रॅली-रोड शोवर निर्बंध कायम, निवडणूक आयोगाच्या बैठकीत निर्णय