भारतीय सैन्य दलाने पहलगाम दहशतवादी हल्ल्यास ऑपरेशन सिंदूर माध्यमातून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Amit Shah ऑपरेशन सिंदूरनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी चर्चा केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गृहमंत्री जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल आणि बीएसएफचे महासंचालक यांच्याशी सतत संपर्कात आहेत.Amit Shah
सीमावर्ती भागात राहणाऱ्या लोकांसाठी सर्व सुरक्षा उपाययोजना सुनिश्चित करण्याचे निर्देश त्यांनी बीएसएफच्या महासंचालकांना दिले आहेत. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील पंतप्रधान मोदींच्या अधिकृत निवासस्थान ७, एलकेएम येथे पोहोचले.
भारताच्या कारवाईबद्दल अमित शाह म्हणाले आहेत की, “आम्हाला आमच्या सशस्त्र दलांचा अभिमान आहे. पहलगाममध्ये आमच्या निष्पाप बांधवांच्या क्रूर हत्येला भारताने दिलेले उत्तर #ऑपरेशनसिंदूर आहे. भारत आणि त्याच्या लोकांवर होणाऱ्या कोणत्याही हल्ल्याला योग्य उत्तर देण्यासाठी मोदी सरकार वचनबद्ध आहे. भारत दहशतवादाचे उच्चाटन करण्यासाठी दृढपणे वचनबद्ध आहे.”
Amit Shahs first reaction after Operation Sindoor
महत्वाच्या बातम्या
- Mock drill महाराष्ट्रातील १६ शहरांमध्ये मॉक ड्रिल ; सायरन वाजणार, ब्लॅकआउट असणार
- अहिल्यानगरमध्ये पोलीस वसाहत अन् प्रशासकीय इमारतीच्या विकासासाठी 102 कोटींचा प्रकल्प
- पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानात घुसून 9 ठिकाणांवर भारताचे मिसाईल हल्ले; Operation sindoor ही तर सुरुवात, अजून बरेच काही बाकी!!
- Operation sindoor : जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा यांच्या म्होरक्यांना मारण्यासाठीच पाकिस्तानात 9 ठिकाणांवर भारताचा मिसाईल हल्ले!!