जाणून घ्या ते असे का म्हणाले? Amit Shahs attack on Lalu Yadav during campaign in Bihar
विशेष प्रतिनिधी
पाटणा : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांनी लोकसभा निवडणूक रॅलींना संबोधित करताना विरोधी पक्षांवर जोरदार निशाणा साधला आहे. दरम्यान, शुक्रवारी (24 मे) बिहारमधील अराह येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी आरजेडी प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, यादव समाजाचा गैरसमज आहे की लालू यादव त्यांच्या समाजासाठी काम करतात, तर ते फक्त त्यांच्या कुटुंबासाठी काम करतात.
- Amit shah : बीएसएफला आवरा, मला शिकवू नका, आगीशी खेळू नका; अमित शहांच्या बंगाल दौऱ्यात ममतांची धमकी!!
आरजेडी प्रमुखांवर आरोप करत गृहमंत्री म्हणाले, “”तेल पिलावन, लठिया घुमावन…इथे एकेकाळी बाहुबलींचे राज्य होते, इथे जंगलराज होते. मात्र आता जोपर्यंत नरेंद्र मोदी आहेत, तोपर्यंत इथे जंगलराज येणार नाही. लालू यादव यांनी त्यांच्या मुलीला राज्यसभेत पाठवले आहे, एक मुलगी खासदार आहे, त्यांच्या मुलांना मंत्री केले आहे, त्यांच्या पत्नीला मुख्यमंत्री केले आहे आणि राबडीजींच्या भावांना मंत्री केले आहे.
आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना गृहमंत्री अमित शाह म्हणाले, “हैदराबादमध्ये मुस्लिमांना ४ टक्के आरक्षण देण्यात आले होते. कर्नाटकमध्ये मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण देण्यात आले होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ११८ मुस्लिम जातींना आरक्षण दिले होते. ज्यावर न्यायालयाने स्थगितीचा निर्णय दिला., तुम्ही भाजपला ४००चा आकडा पार पोहचवा, आम्ही मुस्लिम आरक्षण संपवून मागासवर्गीयांना देऊ.